घरमुंबई'पंतप्रधान आवास योजने'च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

‘पंतप्रधान आवास योजने’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

Subscribe

करोडो रुपयांचा अपहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.

ग्राहकाने दिलेल्या धनादेश आणि कागदपत्रांचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकाने करोडो रुपयांचा अपहार केल्याची तक्रार ग्राहकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. पंतप्रधान आवाज योजनेच्या नावाखाली जमा केलेल्या ग्राहकांच्या कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिक कर्ज काढत असे. या अपहारात अनेक फायनान्स कंपनीचे कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप असून पोलिसांनी या प्रकरणी ११ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

ग्राहकांच्या कागदपत्रांचा उपयोग कर्ज काढण्यासाठी

उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कल्याण (पूर्व) येथील चिंचपाडा येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. डोंबिवलीत राहायला असलेल्या ग्राहकाने ऑक्टोबर २०१७ मध्ये या इमारतीत फ्लॅट बुक केला होता. बांधकामव्यायसायिकाने त्याच्या भागीदारांसह ग्राहकाकडून ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेसाठी त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड, सॅलरी स्लिप व बँकेचे १२ कोरे धनादेश घेतले. या कागदपत्रांचा वापर करून बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या साथीदारांनी ग्राहकांच्या बनावट सह्या करून वाशिंद येथील इमारतीच्या एका फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले. या रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांचा वापर करून कल्याणच्या एका फायनान्स कंपनीकडून १४ लाख ६५ हजारचे कर्ज आणि वसई येथील फायनान्स कंपनीकडून १२ लाख ५० हजारांचे कर्ज काढले.

- Advertisement -

आणखी २३ ग्राहकांनी तक्रारी केल्या

अशाच प्रकारे या ग्राहकाच्या पत्नीच्या कागदपत्रांचा देखील गैरवापर करून याच पद्धतीने पैशांचा अपहार केल्याची तक्रार त्या ग्राहकाने पोलिसात केली आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या २३ लोकांच्या तक्रारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या असून आतापर्यंत एकूण ३ करोड १० लाख ७८ हजार रुपयांचा घोटाळा उघड झाला असून यात फायनान्स कंपनीचे काही कर्मचारी देखील सामील असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक, त्याचे साथीदार यांसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – उल्हासनगरमधील बाजारपेठा जलमय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -