घरमुंबईनोकरीचे आमिश दाखवून महिलेची फसवणूक

नोकरीचे आमिश दाखवून महिलेची फसवणूक

Subscribe

नोकरी डॉट कॉम या सोशल वेबसाईटवर काम करत असल्याचे भासवून मोबाईल तसेच संगणकाच्या माध्यमातून वेशांतर करून स्वतःची ओळख लपवून 26 वर्षीय महिलेची 22 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हर्शला सुरेन्द्रपाल शैलानी असे फसवणूक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

हर्शला शैलानी यांचे इंटेरियर डिझायनरमध्ये एमएससी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोनवर बोलणार्‍या मुलीने स्वतःचे नाव रिया सेन असे सांगून ती नोकरी डॉट कॉम मधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे नाव इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत शॉर्ट लिस्ट झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा तासभराने आदित्य वर्मा नामक इसमाचा त्यांना फोन आला व त्याने 1 हजार आठशे रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी ते पैसे भरले. त्यानंतर पुन्हा 10 हजार 200 रुपये भरण्यास सांगितले. तसेच कंपनी जॉइन्ट केल्यानंतर सर्व पैसे परत मिळतील असे सांगितले, त्यांनी ते पैसे भरले. पुन्हा आदित्य वर्मा यांनी फोन करून 25 हजार 300 रुपये भरण्याबाबत सांगितले, मात्र त्यांनी यावेळी 10 हजार रुपये भरले.

- Advertisement -

त्यानंतर शैलानी यांनी त्यांच्या क्रमांकावर फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी वारंवार फोन केला असता एका व्यक्तीने फोन उचलला व आदित्य वर्मा वारले असल्याचे सांगितले. त्यानंतर नोकरी डॉट कॉमच्या वेबसाईटवरून मोबाइल क्रमांक घेवून त्यावर आदित्य वर्मा यांच्याबाबत खात्री केली असता अशा नावाचा कोणीही इसम तेथे नोकरी करीत नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाले असल्याचे लक्षात येताच त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -