घरताज्या घडामोडीचेंबूर सिद्धार्थ नगरवासीयांची थकबाकी 100 कोटींवर, 'एईएमएल'चा वीज कापण्याचा पवित्रा

चेंबूर सिद्धार्थ नगरवासीयांची थकबाकी 100 कोटींवर, ‘एईएमएल’चा वीज कापण्याचा पवित्रा

Subscribe

मुंबई उपनगरातील चेंबुरच्या सिद्धार्थ नगरच्या रहिवाशांची वीजबिल थकबाकीचा आकडा आता 100 कोटींवर पोहचला आहे. वारंवार संधी देऊनही विजेच्या बिलाचा भरणा न झाल्यानेच आता विजेचा पुरवठा खंडित करण्याची मोहीम अदाणी इलेक्ट्रिसिटीमार्फत हाती घेतली जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याआधी ५ मार्च रोजी अदाणी इलेक्ट्रिसिटी, महाराष्ट्र शासन व सिद्धार्थ कॉलोनीचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत कॉलोनीतल्या रहिवास्यांनी १५ दिवसात मागील थकबाकी पूर्णपणे भरण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आत्तापर्यन्त चार लाख रुपयांपेक्षा ही कमी रकमेचा भरणा झाला  आहे.

बैठकींनंतर सिद्धार्थ कॉलोनीच्या प्रतिनिधी मंडळाच्या नेत्यांनी हे स्पष्ट केले होते कि जून २०१९ नंतरची थकबाकीची रक्कम हे रहिवासी १५ दिवसात भरतील (१२ मार्च २०२२) तर त्याआधीची रक्कम विकासक भरेल.

- Advertisement -

बैठकीनंतर अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड ने हे स्पष्ट केले होते  की वीज बिलाची मागील थकबाकी भरण्याची प्राथमिक जबाबदारी ही कॉलोनीच्या रहिवाश्यांचीच आहे आणि जर बिल्डर पुढे येऊन ही जबाबदारी घेत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो परंतु सर्वानी हे समजून घेणे गरजेचे आहे की  बिले भरण्यात कुचराई करणे हा पर्याय असू शकत नाही. जर बिल्डरने मागील थकबाकी भरण्यात चालढकल केली तर सिद्धार्थ कॉलोनीच्या रहिवास्यांचा वीज पुरवठा पुन्हा एकदा बंद केला जाऊ शकतो.

पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे कि सिद्धार्थ कॉलोनीचे रहिवासी हे त्यांनी दिलेल्या शब्दावरून मागे हटत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे जे ग्राहक आपले बिल नियमितपणे भारतात त्यांच्यवर अनावश्यक बोजा पडतो. त्यामुळे अशा नियमित पणे बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वीज वितरण कंपनीपुढे वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -