घरमुंबईश्वसनाच्या त्रासामुळे छगन भुजबळ जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल

श्वसनाच्या त्रासामुळे छगन भुजबळ जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांना आज सकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुत्रांकडून समजत आहे. आज सकाळी कोर्टात जात असताना त्यांना छातीच दुखू लागले यावेळी अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळत आहे. छगन भुजबळ जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची वकीलांनी कोर्टात माहिती दिली. पुढची सुनावणी ६ सप्टेंबर रोजी पीएमएलए कोर्टात होणार आहे. तोपर्यंत छगन भुजबळ यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे.

कोर्टात जाताना भुजबळांची तब्येत बिघडली

माजी मंत्री छगन भुजबळ हे कोर्टात सुनावणीसाठी जात असताना त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर मेहता हे छगन भुजबळ यांच्यावर उपचार करत आहेत. भुजबळ यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे. आवश्यक वाटल्यास त्यांना अन्य रुग्णालयातही हलवण्यात येऊ शकते, अशीही माहिती देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -