घरमुंबईसेनेचा घाव मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी

सेनेचा घाव मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी

Subscribe

कोपरी पुलाचे भूमीपूजन १० मिनिटांत आटोपले ! 

ठाणे ( प्रतिनिधी ) : ठाण्यात बहुचर्चित ठरलेल्या कोपरी पुलाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या पुलाच्या उभारणीची चर्चा १७ वर्षांपासून केली जात होती. मात्र, राजकीय विरोध, हेवेदावे, विविध परवानग्या यामुळे पुलाचे काम सुरू होण्यास एवढा मोठा कालावधी लागला. पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भूमीपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे स्थानिक नेते यांच्यातील वाढलेले अंतर जाणवत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ १० मिनिटांतच कोपरी पुलाच्या भूमीपूजन आटोपले.
या कार्यक्रमात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी पुरेसा संवाद साधला नाही. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले शिवसेना व भाजप नेते भूमीपूजनाच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. मात्र अवघ्या १० मिनिटात मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजनाची औपचारिकता करून कुणाशीही संवाद न साधता नवी मुंबईकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांना पालघर पोटनिवडणुकीचे शल्य जिव्हारी लागल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.

विकास प्रकल्पात भूमीपुत्रांना न्याय देणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर व संलग्न ठाणे जिल्ह्यात दीड लाख कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा उभारणीचे प्रकल्प सुरु केले असून त्यातील ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या ठाणे जिल्ह्यात सुरु आहेत. हे प्रकल्प पूर्ण करताना स्थानिक भूमीपुत्रांना तसेच या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्यांना त्वरीत न्याय देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

- Advertisement -

९ कोटीचा खर्च २५० कोटीवर !

कोपरी पुलावर बोटेलनेक तयार केल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. २००१ साली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोपरी पुलाच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी या पुलाचा खर्च ९ कोटी रुपये होता. मात्र अनेकवेळा प्रस्ताव आणि आराखडा बनविल्यानंतरही तांत्रिक अडचणी, परवानग्यांच्या अभावी पुलाचे काम सुरू करण्यात आले नाही. अखेर १७ वर्षानंतर सोमवारी कोपरी पुलाचे भूमीपूजन पार पडले. या पुलाचा विस्तार एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी २५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पुलाचे काम ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. सिंगल लेन असलेला कोपरी पूल निर्माणानंतर चार लेनचा कार्नाय्त येणार आहे. पुलाची रुंदी ३७.४० मी इतर असणार आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ २ अधिक २ मार्गिकांचा भुयारी मार्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, ऐरोली-काटई भुयारी आणि उन्नत मार्गाचे भूमीपूजनही याप्रसंगी झाले. या मार्गामुळे ठाण्यातून बाहेरच्या शहरांना जाणारी वाहतूक, तसेच मुंब्रा बायपासवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -