घरमहाराष्ट्रघरबसल्या कळणार एसटीचं लोकेशन

घरबसल्या कळणार एसटीचं लोकेशन

Subscribe

एसटी बसेसना लागणार व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम

मुंबई

ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी आता हायटेक होणार आहे. इतकेच नाही तर अनधिकृत प्रवासी वाहनांनाही आता आळा बसणार आहे. यासाठी लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात येणार आहे. त्याद्वारे एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आता आपली एसटी कुठपर्यंत आली, याचा माग मोबाईल अॅपद्वारे घेणे सहज शक्य होणार आहे.

- Advertisement -

नाशिकला पहिला प्रयोग
एसटीकडून मोबाईल अॅप विकसित करण्याबरोबरच स्थानक आणि आगारात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसवले जाणार आहेत. त्यातही एसटीचा ठावठिकाणा समजणे सहज शक्य होईल. या ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमङ्क (व्हीटीएस) चा पहिला प्रयोग नाशिक विभागात राबवण्यात येणार आहे. ही सुविधा यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांत राबवण्यात येणार आहे. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमङ्क बसवण्याचे काम निविदा काढून एका कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली आहे.

राज्यभर राबविले जाणार
ही यंत्रणा राबविण्यासाठी कंपनीकडून बस स्थानके, आगारांचे सर्वेक्षण सुरू आहे. नाशिक विभागात नवीन यंत्रणा राबवताना राहणाऱ्या त्रुटी, अडचणी आणि प्रवाशांची मते घेऊन त्यात आणखी सुधारणा केल्या जातील आणि त्यानंतरच राज्यातील उर्वरित एसटी आगार, स्थानकांत ती राबविली जाणार आहे. या सिस्टिमसाठी ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होणार आहे.

- Advertisement -

लोकेशन कळणार
एखादी एसटी स्थानकात किंवा आगारातून वेळेवर पोहोचत नाही त्या एसटीला अनेक कारणांमुळे उशीर होत असतो. त्याचा परिणाम अन्य बससेवांवर होतो. मात्र आता ट्रॅकिंग सिस्टीम यंत्रणेमुळे नियोजित एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत होणार आहे. या यंत्रणेमुळे नियोजित आणि अधिकृत बसथांब्यांवर एखादी बस न थांबल्यास त्याची माहितीही महामंडळाला मिळणार आहे. त्यानुसार संबंधित चालक व वाहकावर कारवाईदेखील करता येईल.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -