घरमुंबईखड्डयांभोवती रांगोळ्या; संतप्त नागरीकांचे अनोखे आंदोलन

खड्डयांभोवती रांगोळ्या; संतप्त नागरीकांचे अनोखे आंदोलन

Subscribe

अंबरनाथ पूर्व भागातील शिवमंदिरकडून रिलायन्स रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डयांभोवती नागरीकांनी रांगोळ्या काढत अनोखे असे आंदोलन केले आहे.

अंबरनाथ पूर्व भागातील शिवमंदिरकडून रिलायन्स रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, वारंवार तक्रार करूनही नगरपालिका खड्डे भरण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरीकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. अखेर या विरोधात नगरपालिकेचे या रस्त्यांवरील खड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या भागातील एका सामाजिक संस्थेच्या वतीने रस्त्यावरील सर्व खड्यांभोवती भव्य रांगोळ्या काढत नगरपालिकेविरोधात आंदोलन करण्यात आले होते.

सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या अनेक रस्त्यांची कामे सुरू

अंबरनाथ शहरातील राज्य महामार्ग, मुख्य पाच रस्त्यांचे आणि अनेक भागातील अंतर्गत रस्त्यांचे नगरपालिका आणि एमएमआरडीएकडून करोडो रूपयांचा निधी खर्च करत सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, अंबरनाथ पूर्व भागात बारकू पाडा परिसरात अनेक भव्य गृह संकुले उभी राहत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकांचे स्थलांतर होत आहे. त्यामुळे नगरपालिका या बांधकाम व्यावसायिंकाकडून मोठ्या प्रमाणात विकास अधिभार घेत असली तरी या भागातील रस्ते तयार करण्यासाठी मात्र, दुर्लक्ष करत आहे. या भागात इमारती उभ्या राहत असल्या तरी मुलभूत सुविधा देण्यात नगरपालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शहरातील एकीकडे सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या अनेक रस्त्यांची कामे सुरू असली तरी शहरातील एक भाग नव्याने विकसीत होत असताना, या भागात वास्तव्य करणाऱ्या येणाऱ्या नागरीकांना दुरावस्थेत असलेल्या रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत आहे. शिवमंदिर समोरून जाणाऱ्या या रस्त्यावरून रोज हजारो नागरीक आणि वाहन चालक प्रवास करतात. त्यामुळे पावसाळा जाऊन मोठा कालावधी झाला असतानाही नगरपालिकेला या रस्त्यांची दुरूस्ती करणे गरजेचे वाटत नाही. त्यात या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी या भागातील नागरीकांनी लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या भागातील भालचंद्र भोईर प्रतिष्ठान आणि स्थानिक नागरीकांनी आगळ्या वेगळ्या पध्दतीचे आंदोलन केले आहे. या भागातील रस्त्यांवरील खड्यांच्या भोवती अनेक रांगोळ्या काढत येथून प्रवास करणाऱ्या नागरीकांचा या आंदोलनाला पाठींबा मिळावा यासाठी एक स्वाक्षरी मोहिमही राबवण्यात आली आहे. या आंदोलनाला नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या भागातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे नगरपालिकेने येत्या आठवड्याभरात दुरूस्ती न केल्यास नगरपालिकेविरोधात आंदोलन करण्याचा इशारा प्रतिष्ठान तसेच स्थानिक नागरीकांकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नागपूरचं अधिवेशन हे फक्त औपचारिकताच आहे – देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -