घरमुंबईवाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले वृक्षरोपण

वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले वृक्षरोपण

Subscribe

वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा‘ निवासस्थावर वृक्षरोपण केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या ४९ व्या वाढदिवशी ‘वर्षा‘ निवासस्थावर वृक्षरोपण केले. विशेष म्हणजे आज सुद्धा फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या बैठकांमध्ये भाग घेतला. गेल्या आठवड्यात दिल्लीच्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सदन परिसरात वृक्षारोपण केले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा वृक्षरोपण विषयक मोठे अभियान राबविले जात आहे. एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये आता पर्यंत २ कोटी पेक्षा जास्त वृक्ष लावण्यात आले आहे. येणाऱ्या काळात हे लक्ष ५० कोटींवर नेण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविल्या. देवेंद्र फडणवीस यांचा आज ४९वा जन्मदिवस आहे. ट्विटरद्वारे शुभेच्छा संदेश पाठविताना मोदी म्हणाले, “महाराष्ट्राचे उर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर पोहचवले आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. देशाची सेवा निरंतन चालू ठेवण्यासाठी ईश्वर त्यांना चांगले आरोग्य प्रदान करो.”

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद मोदींप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, पियुष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जेष्ठ नेते अरुण जेटली आदी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -