घरमुंबईहस्तांदोलन नाही, फक्त जोडले हात!

हस्तांदोलन नाही, फक्त जोडले हात!

Subscribe

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठीच्या गणेश पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांदोलन न करता फक्त नमस्कार करणं पसंत केलं. त्यामुळे वेगवेगळे तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना आज चक्क हात जोडले..आता तुम्ही म्हणाल त्यात काय? प्रत्येक राजकारणी हा लोकांसमोर आला की हात जोडतच असतो. पण इथे या दोघांनी लोकांना हात जोडले नसून एकमेकांना जोडले आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जमीन हस्तांतरीत करण्यात आली. यावेळी गणेश पूजन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. पण यावेळी दोघांनी एकदाही एकमेकांना हस्तांदोलन केलं नाही. पत्रकारांनी सांगून देखील त्यांनी हस्तांदोलन केलं नाही. वर फक्त एकमेकांना हात जोडून मोकळे झाले. पण यांनी नेमके हात जोडले तरी का?

बंद दाराआड दोघांची चर्चा!

गणेश पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. यामध्ये दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं? याचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये आलेल्या वितुष्टाच्या पार्श्वभूमीवर ही कटुता कमी करून एकत्र कसं येता येईल? यावरच आतमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेला पटकणारा कोणी पैदा झाला नाही – उद्धव ठाकरे

फक्त नमस्कारावरच भागवलं!

दरम्यान, हे दोघेही चर्चा करून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी जेव्हा त्यांना चर्चा कशावर झाली? यासंदर्भात विचारलं, तेव्हा त्यांनी यावर कोणतंही उत्तर दिलं नाही. शेवटी पत्रकारांनी या दोघांना ‘किमान हातात हात देऊन फोटो तरी द्या’, अशी विनंती केली. मात्र, त्यावर देखील दोघांनी हात हातात न देता फक्त नमस्कार केला. त्यामुळे हा आतमध्ये झालेल्या गरमागरम चर्चेचाच परिणाम होता काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -