घरमुंबईमुख्यमंत्र्यांचा दोन दिवस कोकण दौरा; राणेंचा प्रवेश निश्चित?

मुख्यमंत्र्यांचा दोन दिवस कोकण दौरा; राणेंचा प्रवेश निश्चित?

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातील चर्चांना पुन्हा उधान आले आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे
नेते नारायण राणे नेमकी काय भूमिका घेणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नारायण राणे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र, भाजपकडून अधिकृतपणे त्यांचे पक्षांतर झालेले नाही. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश अध्यापही रखडलेला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात राणेंनी मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपात विलीन होणार असल्याचे सुतोवाच केले. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. आता तिसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकणात भव्य सभेत त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होऊ शकतो. मात्र, याबाबत भाजप किंवा राणे यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.


हेही वाचा – राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपात होणार विलीन

- Advertisement -

 

तिसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा कोकणातून

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. ही महाजनादेश यात्रा दोन टप्प्यात पार पडली असून आता या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस १७ आणि १८ सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्या सभा घेतल्या जात आहे. या सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतात. याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा या यात्रेदरम्यान मोठ्या जल्लोषात पक्षांतराचा कार्यक्रम संपन्न होतो. आता देखील असेच कार्यक्रम कोकणात संपन्न होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -