घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेला उद्यापासून सुरूवात

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेला उद्यापासून सुरूवात

Subscribe

ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीची आहे.

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया १७ जुलैपासून सुरू होत आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीची आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

- Advertisement -

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration 2020-21) या लिंकवर क्लिक करावे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा

  • विद्यार्थ्यांने स्वतःबद्दलची माहिती भरुन नोंदणी करणे
  • एकदा अचुक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.
  • युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्यांने सर्वप्रथम स्वतःबदलची माहितीची खातरजमा करुन पासवर्ड बदलण्याची मूभा देण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजरआयडी आणि पासवर्ड किवा बदलेल्या पासवर्डच्या
  • मदतीने सर्वप्रथम स्वतःबद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता, इ.माहिती भरावयाची आहे.
  • त्यानंतर स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
  • Confirm Profile वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल.
  • ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमुद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्याने निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचे आहेत.
  • एकदा पूर्ण आणि अचूक माहिती भरली गेल्याची खातरजमा करुन भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट घेऊन संबंधित महाविद्यालयात सादर करावयाची आहे.
    ऑनलाईन अर्ज भरताना खालील बाबींकडे लक्ष द्या-
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी करुन माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषय समुहाप्रमाणेच (Combination) विषय निवडणे बंधनकारक असणार आहे.
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्स (प्रोग्राम) साठी करता येईल.
  • विद्यार्थ्यांने शिक्षणक्रम निहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्ताऐवजासह सादर करावयाची आहेत.
  • विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.
  • विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी.
  • स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबतचे नियम व अधिकार हे विद्यापीठ व शिखर संस्थांच्या नियमास अधीन राहून महाविद्यालयांच्या प्रचलित नियमाप्रमाणे असतील.
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे.
  • विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचा फायदा

प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत असून या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याला पीआरएन नंबर लवकर प्रदान केला जातो तसेच परिक्षेचा फॉर्म भरतांना सर्व अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांकडे असल्यामुळे हॉलतिकिट आणि गुणपत्रिका ऑनलाईन माध्यमाने उपलब्ध करुन दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नोंदणीची प्रक्रिया अधिक जलद गतीने व सुलभरित्या केली जाते. मुंबई विद्यापीठामार्फत प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच निर्गमित केले जाणार आहे.


अंतिम वर्षाची परिक्षा घेणे घातक ठरु शकते; हायकोर्टाचा इशारा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -