घरमुंबईमान न मान मै तेरा मेहमान म्हणजे राज

मान न मान मै तेरा मेहमान म्हणजे राज

Subscribe

मान न मान मै तेरा मेहमान अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस साठी ९ सभा घेणार आहेत आणि ते आमच्या विरोधात प्रचार करणार आहेत. मात्र, आमच्यासाठी सर्वात मोठा फायदा हा आहे की, काँग्रेस पक्ष यामुळे उघडा पडला.

काँग्रेस-राष्ट्रवादीने मनसेला आघाडीत घेतले नाही. का घेतले नाही? कारण आघाडीत घेतले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, बिहार उत्तर प्रदेशमध्ये काय उत्तर देणार? एकूणच राज यांची अवस्था दुर्दैवी झाली आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्यासोबत गेलेली मंडळी मनाने हिंदुत्त्ववादी आहेत. त्यामुळे त्यांचा उरलासुरला मतदारही त्यांना सोडून देणार आहे. त्यांच्यासोबत असलेले अनेक जण मनाने शिवसेना आणि भाजपचे मतदार आहेत. त्यावेळेस राज ठाकरे हे एक मोठे नेतृत्त्व होईल असे वाटल्याने हे लोक त्यांच्यासोबत गेले. मात्र त्यांच्या सोबत आता कुणीही नाही.

फार राहिले नाही, राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या तरीही त्यांचा मतदार, म्हणजेच मनसेचा जो काही उरलासुरला मतदार असेल हा मतदार त्यांच्यापासून तुटेल. राज जेवढ्या ताकदीने भाजप आणि सेनेविरोधात बोलतील तेवढ्या ताकदीने त्यांचा मतदार भाजप सेनेकडे वळेल असे मला वाटतेच्या मतदारांना मोदी हवे आहेत हे सत्य आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

एक तरुण नेता, लोकांशी संवाद साधू शकेल असा नेता, अशी राज ठाकरेंची ओळख आहे. मात्र, आता ते जे काही करत आहेत त्यामुळे ते स्वतःचे महत्त्व कमी करून घेत आहेत. राज ठाकरेंच्या सभांना लोक गर्दी करतात पण ते मोदीविरोधी भूमिका घेतील तेवढे त्यांच्या पक्षातले मतदार आम्हाला मत देतील. राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत फार टीका मी करणार नाही, पण त्यांची अवस्था दुर्दैवी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आता फडणवीसांना काय उत्तर देणार?
मनसेच्या आजच्या सभेकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत उघडपणे भाजपविरोधी भूमिका घेणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी शिवाजी पार्कवर गुढी पाडव्यानिमित्त सायंकाळी ५.३० वाजता सभा होत आहे. या सभेत ते काय तोफ डागणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात न उतरता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्याचा निर्णय घेणार्‍या आपल्या भूमिकेचे समर्थन करताना राज हे मोदी आणि भाजपचा काय समाचार घेणार आहेत आणि विशेष म्हणजे बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाना, अशा अर्थाची टीका करणार्‍या मुख्यमंत्र्यांना ते काय उत्तर देतात याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विचारांची गुढी उभारायला चला शिवतीर्थावर असे आवाहन करत मनसेच्या या वार्षिक सभेला लोकसभा निवडणुकीमुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -