घरताज्या घडामोडीआवडत्या कुत्र्याचे निधन झाल्यानंतर मालकाने ठेवली शोकसभा

आवडत्या कुत्र्याचे निधन झाल्यानंतर मालकाने ठेवली शोकसभा

Subscribe

माणूस आणि पाळीव प्राण्यांचे ऋणानुबंध किती घट्ट असतात. याचे एक ताजे उदाहरण सध्या उल्हासनगरमध्ये पाहायला मिळत आहे. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा प्राणी मनुष्यासोबत हजारो वर्षांपासून सहवास करत आहे. पुर्वी शेती आणि शिकारीसाठी पाळला जाणारा कुत्रा आज शहरीभागात देखील आवडीने पाळला जातो. शहरातील लोक आपल्या पाळीव कुत्र्याचे लाड करण्यासाठी चांगले पैसेही खर्च करतात. तर पाळीव प्राण्याच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर दुःखही व्यक्त केले जाते. उल्हासनगर येथे एका पाळीव कुत्र्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या मालकाने थेट शोकसभा आणि विधीवत अंत्यसंस्कार करुन या मुक्या जनावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे.

उल्हासनगर येथे आवडत्या पाळीव कुत्र्याचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर मालकाने त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करून त्याच्या शोकसभेचे आयोजन केले. उल्हासनगर जवळील शहाड परिसरात मोरेश्वर नगर येथील चिंतामणी या इमारतीत रुद्रमणी पांडे हे वकील त्यांच्या कुटुंबासह राहतात. पांडे यांनी स्पिडी नामक कुत्रा पाळला होता. अचानक तो आजारी पडला. पांडे कुटुंबियांनी त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले, मात्र २१ फेब्रुवारी २०२० रोजी त्याचे हृदयविकाराने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -
condolence meeting for pet dog in ulhasnagar
पांडे कुटुंबिय आणि इतर लोक फोटोला अभिवादन करताना

स्पिडीवर पांडे कुटुंबीयांनी कुटुंबातील सदस्यासारखेच प्रेम केले होते. त्यामुळे घरातील सदस्याप्रमाणेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काल स्पिडीला म्हारळ येथील दफनभूमीत दफन करण्यात आले. तर आज सायंकाळी पांडे यांच्या इमारतीच्या आवारात स्पिडीची शोकसभा ठेवण्यात आली होती. हिंदू संस्कृतीप्रमाणे स्पिडीचा तेरावा देखील करण्यात येणार असल्याची माहिती पांडे कुटुंबियांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -