घरक्राइमUP मध्ये षडयंत्र रचून केले होते हत्याकांड; दडून बसलेल्या तिघांना मुंबई पोलिसांकडून अटक

UP मध्ये षडयंत्र रचून केले होते हत्याकांड; दडून बसलेल्या तिघांना मुंबई पोलिसांकडून अटक

Subscribe

अटक करण्यात आलेले आरोपी हे खुनातील आरोपी आहेत. यामध्ये 2001 साली आरोपी रामविलास यादव याचा मोठा भाऊ मृतक मार्कंडेय यादव याला आरोपींच्या गावातील अवधेश यादव व इतरांनी ठार केले होते.

मीरा भाईंदर : उत्तरप्रदेशमधील वाराणसी जिल्ह्यातील मेहरनगर येथे षडयंत्र रचून खून केल्याचा गुन्हा दाखल असलेले आरोपी फरार होते. त्या फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, या आरोपींवर प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षिस होते हे विशेष.(Conspiracy was carried out in UP; The three who were hiding were arrested by the Mumbai police)

आरोपींच्या तपासाच्या अनुषंगाने एसटीएफचे पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव, पोलीस निरीक्षक अतुलकुमार सिंह व त्यांचे स्टाफ हे युनिट 1 कार्यालय येथे हजर राहून लेखी रिपोर्टने कळविले की,गुन्ह्यातील पाहीजे आरोपी रामविलास उर्फ बैलास यादव (55), दिनेश उर्फ गोलू रामविलास यादव,(18),अनिल यादव (20) आणि कमलेश यादव हे चौघेही (रा. ग्राम मालपार, जिल्हा आजमगड, राज्य उत्तरप्रदेश) यांच्या नावाचे 25 ऑगस्ट 2023 रोजी सीजीएम न्यायाधीश जिल्हा न्यायालय आजमगड यांनी पकडण्याचे अटक वारंट जारी केले होते. 29 ऑगस्ट रोजी पोलीस महानिरीक्षक, आजमगड यांनी सदर गुन्ह्यातील पाहीजे आरोपीत यांची माहीती देणाऱ्यासांठी व अटक करण्यासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांचे इनाम घोषीत केलेले होते.

- Advertisement -

हेही वाचा : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या; मग केली आत्महत्या, वाचा…

षडयंत्र रचून केला होता खून

अटक करण्यात आलेले आरोपी हे खुनातील आरोपी आहेत. यामध्ये 2001 साली आरोपी रामविलास यादव याचा मोठा भाऊ मृतक मार्कंडेय यादव याला आरोपींच्या गावातील अवधेश यादव व इतरांनी ठार केले होते. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर गुन्ह्यात पुढे जाऊन अवधेश यादव याचे नाव गुन्ह्यातून काढण्यात आले होते. याचा राग मनात धरून 2019 मध्ये मयत मार्कंडेय यादव यांचा मुलगा सतीश यादव, आरोपी रामविलास यादव, अनिल यादव व इतरांनी अवधेश यादव यास ठार मारले होते. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2023 रोजी सन 2019 मध्ये ठार मारलेले अवधेश यादव घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दुलारे यादव याला आरोपीनी ठार केल्यावरुन मेहरनगर पोलीस ठाण्यात षडयंत्र रचून खून करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा : राजस्थानमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; गर्भवती महिलेला पतीने निर्वस्त्र करून फिरवलं गावभर

मोबाइल लोकेशनवरून मिळाली आरोपींची माहिती

गुन्ह्यातील पाहीजे आरोपी अनिल यादव याचे मोबाइल लोकेशन मिरा भाईंदर परिसरात येत असल्याने पोलीस मदत मागीतल्याने युनिट-1 चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा, सुधीर खोत व पोलीस अंमलदार सनी सुर्यवंशी यांना आदेशीत करून उत्तरप्रदेश एस.टी.एफ. पथकाबरोबर सदर फरार आरोपीला ताब्यात घेणे कामी रवाना करण्यात आले होते. तांत्रीक विश्लेषणावरुन आरोपी रामविलास उर्फ बैलास यादव, दिनेश उर्फ गोलू यादव, अनिल सुभाष यादव यांना काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेण्यात आले व पुढील कार्यवाही कामी सदर पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -