घरCORONA UPDATEठाण्यात एका नगरसेविकेला कोरोनाची लागण

ठाण्यात एका नगरसेविकेला कोरोनाची लागण

Subscribe

गुरूवारी एका नगरसेविकेला आणि अन्य दोन दोघांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच गुरूवारी एका नगरसेविकेला आणि अन्य दोन दोघांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील राजकीय पक्षाच्या एका नेत्याला व पदाधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. गुरूवारी नवीन ३१ रूग्ण आढळले त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या तीनशेच्यावर पोहोचली आहे.

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. झोपडपट्टी आणि दाटीवाटीचा हा परिसर असल्याने कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढल्याने पालिकेने यापूर्वीच नौपाडा कोपर लोकमान्य सावकरनगर परिसर हे ३ मेपर्यंत पूर्णत: सील करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाबाधित रूग्ण दररोज आढळून येत आहेत.  गुरूवारी नव्याने ३१ रूग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये एका नगरसेविकेसह अन्य दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. नगरसेविकेला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात ठाण्यात कोरोनाबाधित ५० रूग्ण आढळून आले आहेत. शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -