घरताज्या घडामोडीभारतीय वंशाच्या मुलीने दिलं नासाच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला नाव

भारतीय वंशाच्या मुलीने दिलं नासाच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला नाव

Subscribe

नासाच्या या स्पर्धेत तब्बल २८ हजार जणांनी भाग घेतला होता. यामध्ये रुपाणीने सुचवलेल्या नावाची निवड करण्यात आली.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या पहिल्या ‘मार्स हेलिकॉप्टर’ ला नाव देण्यात आलं आहे. याचं श्रेय भारतीय वंशाच्या १७ वर्षीय वनीजा रुपाणी हिला जातं. नॉर्थपोर्टमधील अलाबामा येथील ज्युनियर हायस्कूलची विद्यार्थिनी रुपाणीने नासाच्या ‘नेम द रोव्हर’ स्पर्धेत तिने निबंध सादर केला तेव्हा हे श्रेय मिळाले. यांत्रिकी उर्जा आणि प्रोपल्शन सिस्टम असणार्‍या नासाच्या मंगळ हेलिकॉप्टरला आता नामकरणानंतर अधिकृतपणे ‘इंजिन्युटी’ म्हटलं जाईल. रुपाणीने हे नाव सुचवलं जे स्वीकारलं गेलं. नासाने मार्चमध्ये घोषित केले की पुढील रोव्हरचे नाव ‘पर्सिव्हरन्स’ असेल जे सातव्या इयत्तेत शिकत असलेला विद्यार्थी अलेक्झांडर माथेर याच्या एका निबंधावर आधारित हे नाव देण्यात आलं. एजन्सीने मंगळावरील रोव्हरसोबत जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे नाव देण्याचंही ठरवले होतं. आमच्या मंगळ हेलिकॉप्टरला नवीन नाव मिळालं आहे, असं नासाने ट्विट केलं आहे. विद्यार्थिनी वनिजा रुपाणीने ‘नेम द रोव्हर’ स्पर्धेदरम्यान याचं नाव ठेवलं. ‘इंजिन्युटी’ हे हेलिकॉप्टर ‘पर्सिव्हरन्स’ या रोव्हरसोबत मंगळावर जाणार आहे. याबाबत नासाने बुधवारी घोषणा केली. नासाच्या या स्पर्धेत तब्बल २८ हजार जणांनी भाग घेतला होता. यामध्ये रुपाणीने सुचवलेल्या नावाची निवड करण्यात आली. नासाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार रुपाणीने आपल्या निबंधात लिहिले की इंजिन्युटी ही एक गोष्ट आहे जी लोकांना आश्चर्यकारक गोष्टी सिद्ध करण्यास मदत करते. विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपली क्षितिजे विस्तृत करण्यास मदत होईल. तिची आई नौशीन रूपाणी म्हणाली की, रुपाणीला लहानपणापासूनच अवकाश विज्ञानाची आवड आहे.


हेही वाचा – Coronavirus: शारीरिक अंतर राखण्यासाठी त्याने बनवली इलेक्ट्रिक बाईक

- Advertisement -

जुलैमध्ये ‘इंजिन्युटी’ आणि ‘पर्सिव्हरन्स’ प्रक्षेपण होणार आहे आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ते मंगळाच्या झिजेरो खड्ड्यामध्ये ३.५ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या तलावाच्या जागेवर उतरेल. नासाने म्हटलं आहे की रोव्हर मंगळाचे नमुने गोळा करेल, हेलिकॉप्टर तेथे उडण्याचा प्रयत्न करेल आणि जर सर्व काही ठीक झाले तर भविष्यातील मंगळ शोध मोहिमेमध्ये हवाई परिमाण जोडलं जाईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -