घरमुंबईमुंबईत 'या' ठिकाणी होणार कोरोना लसींचं कोल्ड स्टोरेज

मुंबईत ‘या’ ठिकाणी होणार कोरोना लसींचं कोल्ड स्टोरेज

Subscribe

ही जागा निश्चित करण्यात आल्याने मुंबई आणि उपनगरांमध्ये आणि मुंबई बाहेर लसींचा पुरवठा करणे ठरणार सोयिस्कर

गेल्या काही महिन्यांत देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याने कोरोनाची लस कधी येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कोरोनावर अखेर पुण्यातील सीरम संस्थेने लस शोधून काढली आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी सीरम संस्थेची पाहणी देखील केली. मात्र ही लस बाजारपेठेत कधी येणार याची सर्वच नागरित वाट पाहत आहे. मुंबईत महापालिकेने कोरोना लस आल्यानंतर तिची साठवणूक कुठे करायची यासाठी जागा निश्चित केली आहे. दरम्यान कोरोनाच्या लसीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पालिकेनेही कोरोनाच्या लस वितरणासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून मुंबई महापालिकेने कोरोना लस साठवणुकीसाठी कांजूरमार्ग ते भांडुप या परिसरात एका जम्बो कोल्ड स्टोरेजची जागा निश्चित केली आहे. तर लसींसाठी आवश्यक असणारे तापमान आणि त्याला अनुसरून जागेचा शोध मुंबई महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. दरम्यान मोठ्या प्रमाणावर लशीची एकाच ठिकाणी साठवणूक करता यावी यासाठी महापालिका पश्चिम पूर्व उपनगर आणि शहर परिसर अशा तिन्ही ठिकाणी जागेचा शोध घेत होती.

- Advertisement -

दरम्यान मोठ्या प्रमाणावर लशीची एकाच ठिकाणी साठवणूक करता यावी यासाठी महापालिका पश्चिम पूर्व उपनगर आणि शहर परिसर अशा तिन्ही ठिकाणी जागेचा शोध घेत होती. या ठिकाणांपैकीच भांडुप, कांजूरमार्ग या भागात या लसींचा साठा करण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा निश्चित करण्यात आल्याने मुंबई आणि उपनगरांमध्ये आणि मुंबई बाहेर लसींचा पुरवठा करणे सोयिस्कर ठरणार आहे.


सीरमच्या लसीचा मेंदूवर विपरित परिणाम – रुग्णाचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -