घरमुंबईऑनलाइन सेवेत चुकीची माहिती दिल्यास गुन्हा

ऑनलाइन सेवेत चुकीची माहिती दिल्यास गुन्हा

Subscribe

मुंबई महापालिकेच्यावतीने ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर याचा गैरवापर होत असल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवांमधील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेच्यावतीने कडक पाउले उचलली आहेत. ऑनलाईन परवाने तसेच परवानग्या मागताना जर अर्जदाराने चुकीची माहिती दिल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विभाग कार्यालयांना दिले आहेत.

इझ ऑफ डुईंग बिजनेस अंतर्गत महापालिकेने आपला सर्व कारभार ऑनलाइन केला असून याअंतर्गतच विविध खात्यांचे परवाने आणि परवानग्या दिल्या जात आहेत. मात्र, याचाच गैरवापर करत मुख्यमंत्र्यांच्या नावावर लेडीज बार आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नावावर हुक्कापार्लरचे परवाने मिळवण्यात आले आहेत. त्याची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली असून शनिवारी झालेल्या मासिक आढावा बैठकीत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने आपल्या अनेक सोयी सुविधांविषयीची कार्यवाही गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या करभरणा करणे, ऑनलाईन प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे इत्यादी बाबींची कार्यवाही करणे सुलभ झाले आहे. परंतु काही प्रकरणी या सुविधेचा गैरवापर होत असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.या अनुषंगाने अशा प्रत्येक प्रकरणी तसेच प्रत्येक खाते तसेच विभागांमागे एका निरिक्षकाची नियुक्ती करणे व्यवहार्य नसल्यामुळे ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला एक हमीपत्र (स्वयं घोषणापत्र) सादर करणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -

ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना अर्जदाराने अत्यंत काळजी घेऊन खरी व बिनचुक माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज भरताना काही चुकीची किंवा खोटी माहिती भरल्याचे आढळून आल्यास संबंधित अर्जदारावर भारतीय दंड संहितेनुसार व संबंधित कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदविला जाईल, अशी माहिती अर्जदाराद्वारे सादर करण्यात येणा-या हमीपत्रामध्ये नमूद करण्यात येत असते. त्याअंतर्गतच अशाप्रकारची चुकीची माहिती अर्जदाराने दिल्यास त्यांच्याविरोधात त्वरीत गुन्हा दाखल केला जावा,असे निर्देश त्यांनी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -