घरमुंबईरेल्वे विकलांग डब्यात घुसखोरी; महिलांची चपलेने मारहाण

रेल्वे विकलांग डब्यात घुसखोरी; महिलांची चपलेने मारहाण

Subscribe

विकलांग संजीव मोदीविरुद्ध छेड काढत असल्याचा आरोप महिला प्रवाशांनी केला आहे. या महिलांनी विकलांग संजीव विरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी महिलांची आणि संजीव मोदीची तक्रार दाखल करून या प्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

विकलांग डब्यातून अनाधिकृतपणे प्रवास करणार्‍या महिला प्रवाशाला जाब विचारणे एका विकलांग प्रवाशाला चांगले महागात पडले आहे. महिला प्रवाशांनी त्या विकलांगाला धक्काबुकी करून चपलाने मारहाण केली. याची तक्रार मुंबई सेंट्रलचा रेल्वे मार्ग पोलिसांकडे केली करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या महिला प्रवाशांच्या विरोधात राईट्स ऑफ पर्सन डिसेबल अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विकलांग संजीव बन्सीलाल मोदी मागील काही वर्षांपासून डॉकयार्डमध्ये एका खासगी कंपनी काम करतात. त्यांना पॅरालिसिस असल्यामुळे मागील काही वर्षापासून लोकलच्या विकलांग डब्यातून प्रवास करतात. ते नेहमीप्रमाणे डॉकयार्ड ते ग्रान्ट रोडपर्यंत बस प्रवास करतात. त्यानंतर तेथून पुढे बोरिवलीचा प्रवास लोकलचा विकलांग डब्यातून करतात. संजीव त्यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परतीच्या वेळी ग्रांट रोडवरून विरारला जाणारी जलद लोकल पकडली होती. संजीव आणि त्यांचे मित्र विकलांग किरण मोरे नेहमी प्रमाणे दिव्यांगांचा डब्यातून प्रवास करीत होते. तेव्हा काही वेळातच लोकल दादर रेल्वे स्थानकावर पोचली. एक इसम व दोन महिला डब्यात चढल्या. लोकल सुरु होताच तेव्हा संजीवने त्यांना हा विकलांगाचा डबा आहे, असे सांगितले. तेव्हा आम्ही चुकून डब्यात चढलो, असे त्या महिलांनी सांगितले. त्यानंतर संजीव आणि त्या महिला प्रवाशांची शाब्दिक बाचाबाची झाली.

- Advertisement -

वांद्रे रेल्वे स्थानकावर लोकल पोहचेपर्यंत त्यांच्यातील भांडण शिगेला पोहचले. वांद्रे स्थानकात त्या महिला खाली उतरल्या. त्या महिलांनी त्यानंतर संजीवला धक्काबुक्की करून चपलेने मारहाण केली. शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार बघून आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यांनी संजीवलाच धमदाटी केली. आरपीएफने हे प्रकरण मुंबई सेंट्रलच्या रेल्वे मार्ग पोलिसांकडे स्वाधीन केले. रुपाली रामचंद्र मोरे, अनिता सोमनाथ पंजाबी आणि रामचंद्र शंकर मोरे अशी विकलांग डब्यातून अनाधिकृतपणे प्रवास करणार्‍याची नाव आहेत. रेल्वे पोलिसांनी संजीवच्या तक्रारीवरून या तिघांविरुद्ध राईट्स ऑफ पर्सन डिसेबल ऍक्ट २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर विकलांग संजीव मोदीविरुद्ध छेड काढत असल्याचा आरोप महिला प्रवाशांनी केला आहे. या महिलांनी विकलांग संजीव विरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनीसुद्धा महिलांची आणि संजीव मोदीची तक्रार दाखल करून या प्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.


-नितीन बिनेकर / मुंबई
[email protected]

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -