घरमुंबईमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार २६ इलेक्ट्रीक बसेसचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार २६ इलेक्ट्रीक बसेसचे लोकार्पण

Subscribe

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २६ नवीन एसी इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २६ नवीन एसी इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. नरिमन पॉईंट, मुरली देवरा चौक या ठिकाणी या बसगाड्यांचे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुंबई सारख्या शहर भागात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात टाटा मोटर्सने बनवलेल्या वातानुकूलित २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात यापूर्वी बेस्टच्या मालकीच्या ६ इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल आहेत. या व्यतिरिक्त भाडे तत्त्वावरील ६६ इलेक्ट्रिक बसगाड्याही दाखल झालेल्या आहेत. एकूण ३५० इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना प्रदूषणमुक्त प्रवास करायला मिळणार आहे. तसेच, इंधनाची बचत होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पैशाच सोंग करता येत नाही – अजित पवार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -