घरमुंबईपैशाच सोंग करता येत नाही - अजित पवार

पैशाच सोंग करता येत नाही – अजित पवार

Subscribe

जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. या वर्षभराच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारने 4.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय यासारखे महत्वाचे निर्णय झाले. पण २ लाखापर्यंतची कर्जफेड, सातत्याने कर्जफेड करणाऱ्यांना मदत करायचे राहिले. सरकार म्हणून काम करताना पैशाच सोंग करता येत नाही. पण कोरोनाचे संकट, शेतकऱ्यांवरचे संकट अशा अनेक आव्हानांमध्येही महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही डगमगलो नाही. सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण त्याला यश आले नाही. सरकारबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या, गाजरे दाखवण्यात आली. पण यापुढच्या कालावधीत चार वर्षांची पुर्नआखणी करत दमदार वाटचाल करणार असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला नोव्हेंबर अखेरीस जीएसटीच्या रूपात २८ हजार कोटी येणे बाकी आहे. राज्य सरकारला सध्या 4.5 लाख कोटी रूपये हे नुसत्या पगार पेन्शनसाठी द्यावे लागतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या अनेक आश्वासनांची पुर्तता करता आली नाही, त्याचवेळी पैशाच सोंग करता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या सरकारच भवितव्य हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जोपर्यंतच निश्चय आहे, तोवर महाविकास आघाडी सरकारला अडचण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारसमोर अनेक संकटे आहेत, मुकाबला करण्याची ताकद असली की अडचण येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच हित, समान विकास कार्यक्रम, समान धागा मजबुत आहे तोवर काळजीच कारण नाही.

- Advertisement -

डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, फार्मासिस्ट, अंगणवाडी, पोलिस, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी पदाधिकारी यांच्या मदतीने कोरोनाविरोधातील लढाई या सरकारने यशस्वी केली. राज्य सरकारचे नेतृत्व करताना मुख्यमंत्र्यांनी वर्षभरात ठसा उमटवण्याच काम केले. विविध पक्षांमध्येही एकसंघ भावना निर्माण केली. तसेच उत्तम काम करण्याचे स्वातंत्र्यही दिले अशा शब्दात अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. यापुढच्या कालावधीसाठीही आतापासूनच कामाला लागल पाहिजे, विकास योजनांना खीळ बसणार नाही याची काळजी घ्यायला हवी असेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनेक जागांवर आघाडीत आहेत असे कळाले. आता राज्यपाल नियुक्त १२ उमेदवारांची नाव कोश्यारी साहेबांनी जाहीर करावी अशीही विनंती त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -