घरमुंबईबघता बघता... सिध्दार्थ रुग्णालयाची इमारत पत्त्यासारखी कोसळली

बघता बघता… सिध्दार्थ रुग्णालयाची इमारत पत्त्यासारखी कोसळली

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून बंद करण्यात आलेले आणि धोकादायक ठरलेल्या गोरेगावमधील महापालिकेच्या सिध्दार्थ रुग्णालय इमारतीची एक विंग बुधवारी संध्याकाळी पाडण्यात आली आहे. रुग्णालय इमारत धोकादायक असल्याने महापालिकेच्या पी-दक्षिण विभाग कार्यालयाने या इमारतीचा एक जमिनदोस्त केला. महापालिकेने पारंपारिक पध्दतीने या विंगचे पाया कमकुवत केल्याने पत्त्यासारखी ही इमारत जागच्या जागी कोसळली. त्यामुळे उर्वरीत दोन विंगही पुढील आठवडयात टप्प्याटप्याने जमिनदोस्त करण्यात येणार आहे. याठिकाणी ११ मजली रुग्णालय मजली इमारतीचे बांधकाम होणार असून याची निविदा प्रकिया व त्यासाठी मंजुरी जलदगतीने राबवून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.

गोरेगावमधील महापालिकेचे सिध्दार्थ रुग्णालय इमारत दुरुस्तीच्या नावाखाली मागील दीड वर्षांपासून बंद आहे. हे रुग्णालय बंद असल्याने आसपासच्या विभागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे हे बंद रुग्णालय सुरु करण्याची मागणी येथील काही स्थानिकांनी रुग्णालय बचाव समिती स्थापन करून केली होती. दरम्यान महापालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीतही सी-वन प्रवर्गात ही इमारत मोडली गेली होती. त्यामुळे महापालिकेने यातील सर्व साहित्य अन्यत्र हलवून ही इमारत जागच्या जागी ब्लास्ट पध्दतीने जमिनदोस्त करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पावसाळ्यात ही इमारत अशाप्रकारे जमिनदोस्त केल्यास मोठ्याप्रमाण चिखल व मातीमुळे अडचणी निर्माण होवू शकल्या असत्या. त्यामुळे पावसाने उघडीप घेताच बुधवारी संध्याकाळी या इमारतीचा एक भाग जमिनदोस्त केला.

- Advertisement -

सिध्दार्थ रुग्णालयाची इमारत सी आकाराची असून त्यामध्ये तीन विंग आहेत. त्यामुळे बुधवारी एका विगचे भाग पारंपारिक पध्दतीने अर्थातत इमारतीचे एकूण वजन आणि त्यातील अंतर्गत सामान याचे वजन याचा विचार करता अनलोडींग पार्ट काढून टाकण्यात आला. या इमारतीला सात पाया अर्थात कॉलम होते. ज्यातील पाच पाया आधीच कमजोर केले. आणि जे महत्वाचे पाया होते. त्याला जेसीबीच्या माध्यमातून धक्का देण्यात आला. त्यामुळे अवघ्या दीड मिनिटांमध्ये या विंगचा भाग पत्त्यासारखा जागच्या जागी कोसळला. या इमारतीचा भाग जमिनदोस्त केला जात असल्याने नजिकचे दोन रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. इमारत पाडल्यानंतर वाहतूक खुली करण्यात आली होती. त्यामुळे या इमारतीच्या दगडमातीच्या भरावाची विल्हेवाट लावल्यानंतर पुढील मंगळवारी दुसरी विंग जमिनदोस्त करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढील शुक्रवारी किंवा सोमवारी तिसरी विंग पाडली जाईल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आजवर एखाद्या रुग्णालय किंवा इमारतीच्या जागी पुनर्बांधकाम करायचे असल्यास आधी निविदा करून कंत्राटदाराची निवड केली जाते. त्यामुळे इमारत पाडण्यास होणारा विलंब आणि प्रत्यक्ष बांधकामाला विलंब यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो. मात्र, याठिकाणी आधी संपूर्ण इमारत पाडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याठिकाणी ११ मजली रुग्णालय इमारत बांधण्याचे प्रस्तावित असून महापालिका वास्तू विशारदांकडून याचा आराखडा अंतिम झाल्यानंतर जलदगतीने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे या मोकळ्या जमिनीवर तातडीने रुग्णालय उभारणीचे काम सुरु होईल आणि नियोजित वेळेत ते पूर्ण होईल,असा विश्वास महापालिकेला वाटत आहे.

- Advertisement -

अवघ्या २३ वर्षात इमारत धोकादायक

सिध्दार्थ रुग्णालय इमारतीचे बांधकाम हे १९९७मध्ये पूर्ण झाले. सुरुवातील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाण्ल्यानंतरही दोन वर्षे बंद होती. त्यानंतर ते सुरु झाल्यानंतर २०१९मध्ये दुरुस्तीचे कारण देत ते बंद करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम करण्यातच आले नव्हते. त्यामुळे हे रुग्णालय सुरु करण्यासाठी स्थानिकांनी आंदोलनेही केली होती. मालाड, गोरेगाव व जोगेश्वरीतील नागरिकांसाठी हे जवळचे रुग्णालय आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -