घरमुंबईबोरिवलीतील अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बोरिवलीतील अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

Subscribe

बोरिवली येथील गौतम नगर या ठिकाणी बांधण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक कुटुंब ऐन सणासुदीच्या काळात बेघर झाले आहेत.

बोरिवली येथील गोराई ३ मधील गौतम नगर या ठिकाणी बांधण्यात आलेल्या २०० अनधिकृत झोपड्यांवर आर विभागातील पालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली. पालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या असून कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर धडक कारवाईमुळे बोरिवली परिसरात खळबळ उडाली आहे.

गौतम नगर परिसरात अंधार

दिवाळीचा लखलखाट होण्यापूर्वीच गौतम नगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या समोर अंधार निर्माण झाला आहे. शिक्षण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे ज्या विभागातून मत घेऊन निवडून आले आहे. त्याच विभागातील रहिवाशांच्या डोक्यावरील छत हरवून गेल्याचे दिसून येत आहे. मुलांच्या आयुष्यातील शिक्षणाचा ‘अ’ पुसल्याचे चित्र गोराईतील कारवाई करण्यात आलेल्या पालक आणि मुलांच्या डोळ्यांत दिसत आले आहे.

- Advertisement -

२० वर्षापूर्वीच्या झोपड्या

गोराई ३ मधील गौतम नगर हा परिसर कांदळवनात येत असून येथील रहिवाशी २० ते २५ वर्षीय स्थायिक आहेत. गौतम नगर परिसरातील झोपड्या २००० साला पूर्वीच्या असून पालिकेने एक ते दोन वेळा या रहिवाशांना नोटिसा पाठवल्या होत्या. तरी देखील या झोपड्यांचे सर्वेक्षण न करता पात्र झोपडीधारकांना कोणतीही पर्यायी व्यवस्था न घेता त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे. स्वप्नवत घरांची नासधूस केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. ऐन सणासुदीचे दिवस असताना त्यांचे जीवनच सरकारने अंधारात टाकल्याचे येथील रहिवाशांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले आहे.

आम्हा रहिवाशांना कोणतीही नोटीस न देता अचानक आमच्या घरावर पालिकेने कारवाई करून आम्हाला बेघर केले आहे. गेल्या २० ते २५ वर्ष आम्ही येथे वास्तव्यास असताना यंदाचं यांना कारवाईचे कसे सुचले? पालिकेने येथील झोपड्यांचे सर्वेक्षण न करता पात्र असलेल्या घरावर देखील कारवाई केली आहे . पालिकेने येथील घरांचे सर्वेक्षण करून पात्र आणि अपात्र ठरवून जे पात्र असतील त्यांना येथेच किंवा पर्यायी जागा मिळवून द्यावी अन्यथा आम्ही रहिवाशी मोठ्या संख्यने आंदोलन छेडू.  – शरद म्हस्के, रहिवाशी

- Advertisement -

मी स्थानिक आमदार विनोद तावडे यांच्या कामात हस्तांतर करणे बरोबर नाही. मात्र गौतम नगर मधील सर्व झोपड्यांचे सर्वेक्षण झाल्यानंतर ज्या झोपड्या पात्र असतील त्या झोपडीधारकांना आम्ही लवकरच पर्यायी जागा मिळवून देऊ.  – गोपाळ शेट्टी, भाजपचे खासदार

गौतम नगर स्थानिकांना अगोदर नोटिसा दिल्या असत्या तर त्यांना काही मार्ग काढता आला असता. मात्र अचानक गरिबांच्या झोपड्यांवर पालिकेने बुलडोझर फिरवून ऐन दसरा, दिवाळीतच गरिबांचा हसता खेळता संसार अंधारात आणला आहे. पात्र आणि अपात्र न ठरवता सर्वच झोपड्यांवर कारवाई केल्याने सर्वच कुटुंब बेघर अवस्थेत आहेत. आम्ही आरपीआय पक्षाच्या वतीने खासदार गोपाळ शेट्टी यांना लेखी निवेदन दिले असून आठवड्यात येथील झोपडीधारकांना पर्यायी जागा किंवा पुन्हा झोपड्या बांधून देण्यात आल्या नाही तर आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.  – रमेश गायकवाड, युवा मुंबई अध्यक्ष, आरपीआय

वाचा – बोरिवलीमधील अतिक्रमणावर पालिकेचा हतोडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -