घरमुंबईदेवनार पशुवधगृह कामाचा पहिला टप्पा सुरू होणार

देवनार पशुवधगृह कामाचा पहिला टप्पा सुरू होणार

Subscribe

देवनार पशुवधगृहाचे आधुनिकीकरण करण्याची चर्चा मागील अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु आता या पशुधवगृहाच्या आधुनिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत पाडून नवीन बांधकाम करणे तसेच नाला वळवणे आदींचा समावेश आहे.

आधुनिकीकरण आणि समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीकोनातून खाद्य उद्योगातील अन्न उद्योगाशी संबंधित विविध कायद्यांमध्ये तरतूद केलेल्या मानकांचे पालन करण्यासाठी, समाजाच्या हितासाठी आधुनिकीकरणासह सुसज्ज व आधुनिक सोईसुविधा असणारा कत्तलखाना बांधणे अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेने देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार केला आहे. देवनार पशुवधगृहाचे एकूण क्षेत्रफळ ६४ एकर एवढे असून त्या जागेचे विभाजन करून टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे.

- Advertisement -

देवनार पशुवधगृहाचे बांधकाम १९६९-७० मध्ये करण्यात आले होते. या पशुवधगृहातील बहुतांशी व्यवस्था सुस्थितीत नसल्याने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यातील म्हशीकरता असलेला कत्तलखाना, डुकरांसाठी असलेला कत्तलखाना तसेच शेळ्या व मेंढ्यांकरता असलेल्या कत्तलखान्याची स्थिती चांगली नाही. या व्यतिरिक्त कत्तलखान्याच्या आवारात असलेली उपहारगृहे तसेच परवानाधारक व्यापार्‍यांची कार्यालये व इतर बांधकामे धोकादायक परिस्थितीत आहेत. याबाबत केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमधील अहवालानुसार त्यांची मोठ्या स्वरुपातील दुरुस्ती करणे सयुक्तिक नसल्याचे अहवाल म्हटले आहे. त्यामुळे देवनार पशुवधगृहाचे आधुनिकीकरण करण्यासाठी किरकोळ दुरुस्ती करून काही बांधकामे वापरण्यात येत आहेत, तर उर्वरीत धोकादायक बांधकामे तोडून टाकण्यात आली आहेत.

या कामासाठी गिरीश एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी ४७.३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -