घरमुंबईविकासकांनीच झाडांचे जतन करावे; महापालिकेकडे नगरसेवकांची मागणी

विकासकांनीच झाडांचे जतन करावे; महापालिकेकडे नगरसेवकांची मागणी

Subscribe

विकासकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे अद्ययावत सुधारीत महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन कायद्यात सुधारणा करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या विकासकामांमध्ये बाधित होणारी झाडे कापल्यानंतर त्या झाडांच्या बदल्यात दोन झाडे लावणे विकासकांना बंधनकारक करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात विकासकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे अद्ययावत सुधारीत महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन कायद्यात सुधारणा करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. याअंतर्गत झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेचीच राहिल, परंतु याचा खर्च विकासकांकडून वसूल करावा. जेणेकरून कापलेल्या झाडांच्या जागी दुप्पट झाडे लावली जातील. तसेच त्यांचे योग्यप्रकारे जतन होईलच शिवाय पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण होईल, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका कृष्णावेणी रेड्डी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

विकासकामांमध्ये बाधित होणारी झाडे कापण तितकेच आवश्यक असल्यामुळे पर्यावरण व विकास यांची सांगड घालून भविष्यात पुढे जाणे आवश्यक आहे. विकासाच्या आड येणारी झाडे कापताना एकाच्या बदल्यात दोन झाडे कापण्यास परवानगी देण्याची अट आहे. परंतु अनेकदा विकासकांकडून या अटींचे पालन केले जात नसल्याचा आरोप होत असतो. तसेच विकासकांकडून लावण्यात येणारी किती झाडे जिवंत आहेत, अथवा किती झाडे मृत पावली याची माहितीही कधीच उपलब्ध होत नाही. म्हणूनच विकासकांनी कापलेल्या झाडांच्या बदल्यात दुप्पट झाडे लावण्यात येतील या अटींची पुतर्ता करण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे कृष्णवेणी रेड्डी यांनी ठरावाच्या सूचनेत स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -