घरमुंबईशिवसेनेच्या गीता भंडारींची नगरसेवकपदी निवड

शिवसेनेच्या गीता भंडारींची नगरसेवकपदी निवड

Subscribe

शिवसेनेची नगरसेवक संख्या पोहोचली ९४ वर

मालाड येथील प्रभाग क्रमांक ३२च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी केणी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने, त्यांच्या जागा दुसर्‍या क्रमांकावरील शिवसेना उमेदवार गीता भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. महापालिका सभागृहात मंगळवारी महापालिका सदस्यपदी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. गीता भंडारीमुळे शिवसेना नगरसेवकांची संख्या ९४ एवढी झाली आहे. मालाड मार्वे येथील प्रभाग क्रमांक ३२ मधून स्टेफी केणी या काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई महानगर पालिकेमध्ये निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्राला शिवसेनेने आव्हान दिल्यामुळे जातप्रमाणपत्र वैधता समितीपुढे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांचे जात प्रमाणपत्र आता अवैध ठरवण्यात आले आहे.

त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढली

उच्च न्यायालयाने याबाबतीत काही दिवसांपूर्वीच निर्णय दिला आहे. या निर्णयाची प्रत महापालिका आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आली होती. परंतु अनेक दिवसांपासून आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी हे प्रकरण प्रलंबित होते. त्यामुळे दुसर्‍या क्रमांकावरील शिवसेनेच्या गीता भंडारी यांची नियुक्तीची अधिकृत घोषणा रखडली होती. परंतु मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सभेमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गीता भंडारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करत त्यांना महापालिका सदस्यत्व बहाल केले. त्यामुळे शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्या वाढली असूनही ही संख्या आता ९४ एवढी झाली आहे.

- Advertisement -

स्थायी समिती सदस्यपदी जावेद जुनेजा

काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी महापालिका सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्तजागी काँग्रेसच्यावतीने जावेद जुनेजा यांची नियुक्ती करण्यात आ ली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी लोकरे यांच्या रिक्तजागी काँग्रेस नगरसेवक जावेद जुनेजा यांचे नाव सुचवले असून त्यानुसार महापौरांनी स्थायी समिती सदस्य म्हणून जुनेजा यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.


अति उत्साही कार्यकर्त्यांनी निकलापूर्वीच भाजपा उमेदवाराला केले आमदार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -