घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे कॅगमार्फत विशेष 'ऑडिट' करा, फडणवीसांची मागणी

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे कॅगमार्फत विशेष ‘ऑडिट’ करा, फडणवीसांची मागणी

Subscribe

कार्यक्रमाच्या निमित्ताने जबरदस्त फटकेबाजी करीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात व मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्याची संधी सोडली नाही. देशातील कोणत्याही पालिकांच्या तुलनेत मुंबई महापालिकेत सर्वात जास्त भ्रष्टाचार सुरू असल्याचा दावा केला.

मुंबई महापालिकेत कोविड काळातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला असून सत्ताधारी शिवसेनेवर तगडा प्रहार केला आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेतील या भ्रष्टाचाराचे कॅगमार्फत विशेष ‘ऑडिट’ करण्यात यावे, अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या मुंबईसह राज्यात शिवसेना व भाजप यांच्यातील वादविवाद विकोपाला गेला आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर एकापेक्षा एक गंभीर, धक्कादायक आरोप व प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे जनता संभ्रमित होत आहे. आता शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फडणवीस यांना कोणत्या शब्दांत उत्तर देणार, प्रत्त्यारोप करणार, ते पाहावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि मुलुंड येथील नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी नगरसेवक म्हणून गेल्या ५ वर्षात जिंकही विकासकामे केली त्याबाबतच्या कार्यअहवालाचे प्रकाशन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात शनिवारी दुपारी करण्यात आले. याप्रसंगी, भाजपचे नेते व तडफदार आमदार अॅड. आशिष शेलार, मुलुंड येथील भाजपचे स्थानिक खासदार मनोज कोटक, आमदार मिहिर कोटेचा आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबई महापालिकेत देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचार

सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने जबरदस्त फटकेबाजी करीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात व मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्याची संधी सोडली नाही. देशातील कोणत्याही पालिकांच्या तुलनेत मुंबई महापालिकेत सर्वात जास्त भ्रष्टाचार सुरू असल्याचा दावा केला.

मुंबई महापालिकेत प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याइतपत निर्लज्जता पालिकेत निर्माण झाली आहे. पालिकेतील भ्रष्टाचाराचे कॅगमार्फत विशेष ‘ऑडिट’ करण्यात यावे, अशी मागणी आपण करणार असल्याचे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेत कोविड काळातही अतिशय निर्लज्जपणे भ्रष्टाचार सुरू आहे. ज्यांना कामाचा कोणताच अनुभव नाही, अशा लोकांना रातोरात कोट्यवधी रुपये खर्चाची कोविड केंद्रे चालविण्यासाठी देण्यात आली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पालिकेच्या कोविड केंद्रात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या लोकांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. पालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, यासाठी सत्ताधारी पक्ष

- Advertisement -

भाजप नगरसेवकांना ऑनलाईन बैठकीत बोलू दिले जात नाही, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही भाजपसाठी नाही तर मुंबईचे भवितव्य कुणाच्या हाती सुरक्षित राहिल हे ठरवणारी आहे, असे प्रतिपादन करताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिमानाने स्वतःचा उल्लेख देशाचा सेवक असल्याचे सांगितले. मात्र काही लोक महाराष्ट्राला आपली खासगी संपत्ती समजत असल्याचा टोलाही फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.


हेही वाचा : उद्याने, मैदाने व क्रीडांगण पालिका दत्तक तत्वावर देणार, अतिक्रमण रोखण्यासाठी लवकरच नवीन धोरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -