घरमुंबईपोलीस ठाण्यातील हत्येच्या निषेधार्थ धनगर समाजाचा मोर्चा

पोलीस ठाण्यातील हत्येच्या निषेधार्थ धनगर समाजाचा मोर्चा

Subscribe

नालासोपारा पोलीस ठाण्यात झालेल्या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

नालासोपारा पश्चिमेकडे राहणार्‍या कोमल आकाश कोळेकर (20) या विवाहित आणि गर्भवती महिलेने रविवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचा पती आकाश कोळेकर याला ताब्यात घेऊन सोमवारी पोलीस ठाण्यात चौकशी सुरु होती. त्यावेळी कोमलचा भाऊ रविंद्र काळेल (22) हाही त्याठिकाणी हजर होता. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्षात चौकशी सुुरु असताना रविंद्रने आपल्याजवळील चाकू काढून थेट आकाशवर हल्ला चढवला होता. यात आकाशचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

आकाश धनगर समाजाचा होता. आकाशची थेट पोलीस ठाण्यातच हत्या करण्यात आल्याने संतप्त झालेल्या धनगर समाजाच्यावतीने नालासोपारा पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला. पोलीस ठाण्यातच खून होऊ लागल्याने आता नागरीक शहरात सुरक्षित राहूच शकत नाहीत. असा आरोप मोर्चेकर्‍यांनी यावेळी केला. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

तसेच आरोपीला मदत करणार्‍यांनाही शासन झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली. निवडणुका असल्याने आंदोलन शांततेत करण्यात आले. मात्र, आरोपींना कडक शिक्षा झाली नाही तर मात्र निवडणुकीनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -