घरमुंबईगणेशोत्सव मिरवणुकीत ढोल-ताशामुळे ध्वनिप्रदूषण

गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल-ताशामुळे ध्वनिप्रदूषण

Subscribe

मुंबईतील एकूण २२ ठिकाणांची गणेशोत्सवाच्या काळातली ध्वनीप्रदूषणाची आकडेवारी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ध्वनीप्रदूषण सांताक्रुझ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ध्वनीप्रदूषणामुळे मुंबई हायकोर्टाने डीजेवर बंदी आणली होती. त्यामुळे मागच्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत कमी ध्वनीप्रदूषण झाल्याचे समोर आले. मात्र यंदा ढोल-ताशा आणि बँजोमुळे ध्वनी प्रदूषण झाल्याचे उघड झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या ध्वनीप्रदूषणाच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकादारांनी दाखल केलेल्या अहवालामध्ये हे सांगण्यात आले आहे. याचा खुलासा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

डीजे बंदी असूनही ध्वनीप्रदूषण

आवाज फाऊंडेशनच्यावतीने मुंबई हायकोर्टात केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. मुंबईसह पुणे, नाशिक याठिकाणच्या ध्वनी प्रदूषणाची माहिती याचिकादारांनी दिलेल्या अहवालामध्ये दिली आहे. राजकीय पक्षांच्या मंडळांकडून रात्री उशीरा सर्रास ध्वनीवर्धक लावण्यात आले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. मुंबईतील एकूण २२ ठिकाणांची गणेशोत्सवाच्या काळातली ध्वनीप्रदूषणाची आकडेवारी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ध्वनीप्रदूषण सांताक्रुझ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

ध्वनीप्रदूषणाची आकडेवारी

खार लिंकिंग रोड (१०४.७ डीबी), जूहू एसएनडीटी विद्यापीठासमोर (१०७.७ डीबी), जुहूमांगले वाडी (१००.५ डीबी), भगवान स्टोर सांताक्रूझ (११३.९), सायन सर्कल (१०७.४), सायन कोळीवाडा (१०७ डीबी), सायन सर्कल (१००.२ डीबी), मांटुगा शोभा हॉटेल (११० डीबी), वरळी लव्हग्रोव्ह (१०७ डीबी), वरळी अॅट्रीया मॉल (१०९.६ डीबी) मुंबईतल्या याठिकाणी ध्वनीप्रदूषण झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -