घरमहाराष्ट्रपुणे विद्यापिठातर्फे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘ग्रंथ-फराळ’

पुणे विद्यापिठातर्फे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘ग्रंथ-फराळ’

Subscribe

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागाच्या वतीने दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथरूपी बौद्धिक फराळ डॉ. अवचट यांच्या हस्ते रवाना करण्यात आला.

‘साहित्यात समाजाचे प्रतिबिंब येत असते. त्यामुळे त्यातील अनेक अनुभव प्रेरणा देणारे ठरतात. म्हणजेच एका अर्थाने साहित्य जगण्याची प्रेरणा देते’, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागाच्या वतीने दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथरूपी बौद्धिक फराळ डॉ. अवचट यांच्या हस्ते रवाना करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच बीजांकुर या भित्तीपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी डॉ. श्रुती तांबे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे होते.

साहित्यात रोजच्या जगण्याच्या व्यथा आल्या पाहिजे – डॉ. अवचट

डॉ. अवचट म्हणाले कि, ‘मनात साचलेल साहित्याच्या रूपाने आपोआप बाहेर येतं, ते दर्जेदार साहित्य असते. आपल्या साहित्यात रोजच्या जगण्याच्या व्यथा आल्या पाहिजे. केवळ आलबेल साहित्य लिहून प्रगती साधता येणार नाही. महासत्ता होताना उपेक्षित घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्या जगण्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे.’डॉ. रोंगटे यांनी प्रास्ताविक करताना बौद्धिक फराळ उपक्रमाची माहिती देताना म्हणाले कि, ‘एम.ए.च्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम हाती घेतला. विभागातून भेट स्वरुपात त्यांनी विविध पुस्तके गोळा केली. ही पुस्तके आज,गुरुवारी विद्यार्थ्यांकरवी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या परिसरात पाठविताना आनंद होत आहे.’ आणि विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्लेंची १ लाखांची फसवणूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -