घरमुंबईसहनशीलतेचा फायदा घेऊ नका

सहनशीलतेचा फायदा घेऊ नका

Subscribe

अभिनेत्री-तेजश्री प्रधान…

माणसाकडे पैसा असला म्हणजे समस्या सुटतात असे नाही. सामान्य माणसाला ज्या अडचणीतून जावे लागते तशाच काहीशा पण वेगळ्या अडचणीतून व्यावसायिक, श्रीमंत माणसालाही जावे लागते. यात प्रामुख्याने संरक्षण हे हवेच असते. त्याच्या गरजा या वेळच्यावेळी अल्प दरात कुठल्याही भ्रष्ट मार्गाने मोबदला न देता पूर्ण झाल्या पाहिजेत. तुमच्या इच्छेप्रमाणे, गरजेप्रमाणे सुविधा उपलब्ध होणे म्हणजेच माझ्यासाठी संरक्षण असे मला वाटते.

- Advertisement -

ते घरात बसून किंवा आरडाओरडा करून मिळेल यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे प्लीज मतदान करा. आपला अधिकार बजावा असे मी तुम्हाला सांगेन. विश्वासातील माणसाला मत दिल्याने विश्वासार्हता निर्माण होते हे प्रत्येक मतदाराने लक्षात ठेवायला हवे. अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकाच्या गरजा आहेत, याला मी क्रम देणार नाही. येणार्‍या सरकारने एकाचवेळी या गोष्टी पूर्ण करायला हव्यात. त्याला कारण म्हणजे माणसाला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही दुसर्‍या गोष्टीवर अवलंबून आहे.

वीज असेल तर रस्ते होतील, रस्ते असतील तर श्रमदान होईल, श्रमदान असेल तर अन्नाची गरज भागेल. इतर देशांपेक्षा भारत हा सहनशील देश आहे. अतीविरोध करण्यापेक्षा सहनशीलतेने प्रश्न सुटतात की नाही याचा मतदार अंदाज घेत असतात आणि सरकार त्याचा फायदा घेत असते. बेसिक गोष्टी पूर्ण करा असे माझे सांगणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -