घरमुंबईसुसंस्कृत डोंबिवलीकरांनी ढोसली ८४ लाख लिटर दारू

सुसंस्कृत डोंबिवलीकरांनी ढोसली ८४ लाख लिटर दारू

Subscribe

‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिए…’ असं म्हटलं जातं. कधी दु:खात कधी आनंदात पार्टी म्हणून, तर व्यसन जडल्यामुळे दारू पिणार्‍यांचे प्रमाण कमी नाही. सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंबिवलीत वर्षभरात तब्बल ८४ लाख लिटर देशी-विदेशी दारू आणि बीअर फस्त केल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी देशी-विदेशी दारूच्या विक्रीत वाढ झाल्याचे डोंबिवली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत बीअरची विक्री घटली असून, देशीची ११ टक्के तर विदेशीची ४ टक्क्यांनी वाढली आहे. वाईनच्या विक्रीतही ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात देशी-विदेशी दारू आणि बीअर अशी एकूण ८४ लाख लिटर दारू मद्यप्रेमींनी रिचवली आहे. या विक्रीतून शासनाच्या तिजोरीत १ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

- Advertisement -

डोंबिवलीकरांनी स्ट्राँग बीअरला सर्वाधिक पसंती दिली असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत असले तरी २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये सव्वा लाख लिटर बीअरची विक्री घटली आहे. तर विदेशी दारूची विक्री ८३ हजार लिटरने तर देशी दारूची विक्री दीड लाख लिटरने वाढली आहे. शहरात बीअरनंतर विदेशी दारू सर्वाधिक विक्री हेाते. या तुलनेत वाईन पिणार्‍यांची संख्या तुलनेत कमी आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये वाईनची विक्री ४ हजार लिटरने वाढली आहे. तसेच अवैध दारू विक्रेत्यांवरही कारवाईचे प्रमाण वाढले आहे. या विभागाने वर्षभरात कारवाई करून १८८ गुन्हे दाखल केले असून, १७७ जणांना अटक केली आहे. गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून सुमारे ४२ हजार लिटर गावठी दारूही जप्त करण्यात आलीय.

धाब्यावर अवैधपणे दारू विक्री करणार्‍यांवर कारवाई केली असून देशी-विदेशी दारूही जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे २३ लाख ५१ हजार ६६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. डोंबिवली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत शहर व ग्रामीण परिसराची हद्द मोठ्या प्रमाणात होती. मात्र सप्टेंबर २०१८ नंतर कोळसेवाडी आणि इतर ग्रामीण परिसर हा उल्हासनगर विभागाकडे जोडण्यात आला आहे. त्यामुळे डोंबिवली विभागाची हद्द कमी झाली आहे. सध्या या विभागांतर्गत डोंबिवली पूर्व- पश्चिम, टाटा नाका ते मुंब्रा, दहिसर, मोरी आणि हेदुटणेपर्यंतचा परिसर येतो. या विभागांतर्गत वॉईन शॉप, परमीट रूम, देशी दारू, बीअर शॉप असे एकूण २१४ परवानाधारक आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -