घरमुंबईवंचितांसाठी अंथरूण-पांघरूण जमविण्यासाठी आविष्कारचा जागर

वंचितांसाठी अंथरूण-पांघरूण जमविण्यासाठी आविष्कारचा जागर

Subscribe

घरातील जुने स्वेटर, चांगल्या अवस्थेतील अंथरूण (बेडशीट, पट्ट्या) पांघरूण (चादरी, शॉल, गोधडी, रग) आविष्कारला देऊ शकता. ते वंचितांपर्यंत पोहचविण्यात येईल, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबई ठाणे परिसरात थंडी जोर धरू लागली आहे. झोपड्यांमध्ये व फूटपाथवर उघड्या वातावरणात राहणाऱ्यांचे व त्यांच्या चिमुकल्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी कल्याणातील आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनने पुढाकार घेत स्वेटर आणि अंथरूण पांघरून जमविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आपल्या घरातील जुने स्वेटर, चांगल्या अवस्थेतील अंथरूण (बेडशीट, पट्ट्या) पांघरूण (चादरी, शॉल, गोधडी, रग) आविष्कारला देऊ शकता. ते वंचितांपर्यंत पोहचविण्यात येईल, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

गरीबांना थंडीत मायेची ऊब देण्याचा प्रयत्न

निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी, मोकळ्या रानात राहणारी थंडीचा मारा सर्वात जास्त सोसणारी आदिवासी मुले, माणसे, स्रिया पोटात पाय घालून हूडहुडत कसेबसे दिवस काढतात व दुसऱ्या दिवशी पुन्हा कामानिमित्त बाहेर पडतात. यांची चिमुकली पोरं अर्धनग्न अवस्थेत परिस्थितीशी दोन हात करत भटकत असतात. या मुलांना त्यांचे हे शरीर झाकता यावे, थंडीपासून या चिमुकल्यांचे संरक्षण व्हावे यासाठी कल्याण येथील आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनच्यावतीने स्वेटर आणि अंथरूण, पांघरूण जमविण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

गरजवंतांना मदत करण्याचे आवाहन

आपल्या घरातील जुने स्वेटर, चांगल्या अवस्थेतील अंथरूण (बेडशीट, पट्ट्या) पांघरूण (चादरी, शॉल, गोधडी, रग) तुम्ही आविष्कारला देऊ शकता. हे आम्ही फुटपाथवर पोटात पाय घालून पडलेल्या, आदिवासी पाड्यावर परिस्थितीशी दोन हात करत कसेबसे थंडीपासून स्वत:ला वाचवणाऱ्या गरजवंतांना वाटप करणार आहेत. आमच्या कार्यकर्त्यांची टीम हे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार आहे. जास्तीत जास्त लोकांनी, लोकासहभागातून असे पुढे येणे गरजेचे आहे. लोक सहभागातून जास्तीत जास्त गरजवंतांना आपण सहकार्य करू शकतो. त्यांच्या कष्टकरी चेहऱ्यावर आनंद देऊ शकतो. सर्वांनाच वेळ देणे शक्य होत नाही. परंतु आमच्या सारख्या संस्थेच्या माध्यमातून आपली मनोभावे मदत निश्चीतच या गरजवंतांपर्यंत आम्ही पोहचवू शकतो. तरी मोठ्या प्रमाणावर या अंथरून पांघरून उपक्रमात सहभाग घेऊन आपली मदत आमच्यापर्यंत पोहोचावा, असे आवाहन आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनच्यावतीने करण्यात येत आहे.

मदतीसाठी येथे करा संपर्क

आपल्या मदतीसाठी व एनजीओचा भाग बनण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता, असे विनोद शेलकर यांनी सागितले. संपर्क : विनोद शेलकर : ९८६७०६५०६९, वैशाली शिंदे : ९३२१०७४०८१.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -