घरमुंबईराज यांच्या अयोध्या दौऱ्याचे राजकारण करू नका - संजय राऊत

राज यांच्या अयोध्या दौऱ्याचे राजकारण करू नका – संजय राऊत

Subscribe

राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्चमध्ये अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे घोषणा झाल्यावर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. यावर वेगवेगळ्या पक्षांतील राजकारण्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे कोणीही राजकारण करू नका, कोणी प्रभु रामाच्या दर्शनासाठी जात असल्यास त्याच्या राजकीय मत व्यक्त करण्याची काही आवश्यकता नाही. राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे कोणाला रामाचे दर्शन घ्यायला जायचे असल्यास त्याकडे राजकारण म्हणून पाहता येणार नाही तसेच कोणीही राजकारण करू नये असे आमचेही स्पष्ट मत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

प्रभू श्री रामांवर माझी श्रद्धा आहे. प्रत्येकाने श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जावं. राज ठाकरे अयोध्येला जात असतील तर चांगली गोष्ट आहे. हवे असल्यास त्यांना आम्ही पूर्ण मार्गदर्शन करू, राम मंदिर कुठे आहे. मुर्ती कुठे आहे. मंदिरात पुजारी कोण आहे. जायचे कसे, तिकडे गेल्यावर काय करायचे, शरयूच्या तीरावर गेल्यावर काय करावे लागते. अशी सगळी माहिती कोणी मागितली तर आम्ही त्यांना नक्की देऊ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा संबंध २०२२ मधील मुंबई महापालिका निवडणूकांना जोडू शकत नाही. असे केल्यास ते अयोग्य ठरेल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राम मंदिर हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे कोणाला अयोध्येला जावंस वाटलं तर तिकडे जाऊन घंटा वाजवून यावं यावर कोणाला हरकत असण्यासाठी कोणतेही कारण नाही. प्रभु राम हे महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची अस्मिता आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेने जाऊन शरयू नदीच्या तीरावर आंदोलन केले. यानंत या आंदोलनामुळे एक चळवळ सुरु झाली नाहीतर त्यापूर्वी सगळे काही थंड पडले होते. शिवसेने केलेल्या आंदोलनामुळे राम मंदिराची उभारणी सुरु झाली आहे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

याआधी राज्याचे मुख्यमंत्री यांनी अयोध्या दौरा केला होता. शरयूच्या तीरावर मुख्यमंत्र्यांनी महाआरतीही केली होती. तर आता राज ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -