घरमुंबईपथनाट्यातून दिला 'अवयवदानाचा' संदेश

पथनाट्यातून दिला ‘अवयवदानाचा’ संदेश

Subscribe

'अवयवदान' ही काळाची गरज आहे असा संदेश देणारं पथनाट्य दोस्ती संस्थेद्वारे सादर करण्यात आलं.

नुकतंच ‘दोस्त’ या संस्थेकडून अवयव दानाचं महत्व पटवून देणारं एक पथनाट्य सादर करण्यात आलं. ‘पार्टीत अचानक मेंदूमृत होऊन मृत पावलेल्या मुलाच्या वडिलांना, त्या मुलाचे अवयवदान करण्याचं डॉक्टर आवाहन करतात’, अशा आशयाचं हे पथनाट्य नवी मुंबईत सादर करण्यात आलं. अवयवदान ही काळाची गरज असल्याचं या पथनाट्यावरुन पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. अवयवदानाचं महत्त्व प्रभावीपणे पटवून देणाऱ्या या पथनाट्याने ‘दोस्त’ या आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या अवयवदान दिंडीचा पालखी प्रस्थान सोहळा नवी मुंबईत रंगला. ‘धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशल- हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन’ (दोस्त) ही संस्था गेली काही वर्षे विठ्ठलाच्या वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक आणि अवयवदान विषयक जाणीव जागृती करण्याचे काम करत आहे.

पथनाट्य सादर करताना ‘दोस्त’चे कार्यकर्ते

पूर्वी लोकप्रबोधनाचे कार्य संतांनी केलं. हेच कार्य सध्या दोस्तचे डॉ. कैलाश जवादे सध्या करत आहेत. उपमहापौर चारुशिला घरत, आरोग्य सभापती डॉ. भगत यांनी यावेळेस अवयवदानाच्या प्रसारासाठी दोस्त संघटना आणि जवादे कुटुंबिय करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केलं. तर या दिंडी सोहळ्यात डॉ. गौतम वाकचौरे यांनी स्त्रियांना कर्करोगाबद्दल जागृत राहण्याचे आणि खबरदारीचे उपाय म्हणून आवश्यक त्या चाचण्या करण्याचं आवाहन केलं. दोस्त संस्थेचे सचिव आणि परभणीचे नामवंत डॉ. गोविंद जवादे यांनी या संस्थेचा जवळपास  दोन दशकांचा प्रवास उलगडून दाखवला. एड्सबद्दल कलात्मक पद्धतीने राज्यभर केलेल्या जाणीव जागृतीच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. याप्रसंगी दोस्तच्या नवी मुंबई विद्यार्थी शाखेचा पदग्रहण सोहळाही पार पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -