घरमुंबईनायरच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. रमेश भारमल

नायरच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. रमेश भारमल

Subscribe

डॉ. रमेश भारमल यांच्याकडे पुन्हा नायर हॉस्पिटलची जबाबदारी सोपवण्यात आली आहेत. तर डॉ. मोहन जोशी यांनी सायन हॉस्पिटलचा कार्यभार स्विकारला आहे.

सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णांशेजारी मृतदेह ठेवल्याच्या वृताने खळबळ माजली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालकपदी असलेल्या डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नियुक्ती केली. परंतु आता डॉ. रमेश भारमल यांच्याकडे पुन्हा नायर हॉस्पिटलची जबाबदारी सोपवण्यात आली आहेत. तर डॉ. मोहन जोशी यांनी सायन हॉस्पिटलचा कार्यभार स्विकारला आहे.

डॉ. भारमल यांना नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदासह तिन्ही वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालक पदाची संयुक्त जबाबदारी होती. मात्र, एप्रिलमध्ये अधिष्ठाता पदापासून त्यांना दूर करत त्या जागी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांची बदली करत भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नियुक्त केली होती. परंतु आता पुन्हा त्यांच्याकडे नायर हॉस्पिटलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जोशी यांनी अनेक वर्षे सायन हॉस्पिटलमध्ये सेवा दिली आहे तर मी सात ते आठ वर्षे नायरच्या अधिष्ठातापदी होतो. त्यामुळे आम्ही ही वैयक्तिक स्तरावर बदली करून घेतली असल्याची माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -