घरमुंबईडॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचे रक्षण व्हावं ही प्रकाश आंबेडकरांची इच्छा... - संजय राऊत

डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचे रक्षण व्हावं ही प्रकाश आंबेडकरांची इच्छा… – संजय राऊत

Subscribe

मुंबई : देशात संविधानावर हल्ला होत असून हूकुमशाही येत आहे आणि लोकशाही नष्ट होत आहे. त्यामुळे देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) संविधानाचे (Constitution) रक्षण व्हावे ही प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) इच्छा आहे. देशाच्या संविधानाचे रक्षण करावे, वंचितांचे रक्षण करावे, त्यांच्या हक्काचे रक्षण करावे या भूमिकेतून शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raur) यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.

उद्या १४ एप्रिल निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं महत्त्व काय आहे हे प्रकाश आंबेडकरांना माहित आहे कारण ते त्या कुटुंबातले आहेत, परंतु देशात गेल्या काही दिवसांपासून संविधानावर हल्ला होत असून हुकुमशाही येत आहे आणि लोकशाही नष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण व्हावे ही प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे. त्याच एका भूमिकेतून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन संविधानाचे रक्षण करावे, वंचितांच रक्षण करावे, त्यांच्या हक्काचे रक्षण करावे या भूमिकेतून आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

…म्हणून मी शिवसेनेवर बोलेण
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात जागा वाटपावरून प्राथमिक चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून वेगवेगळ्या जागा वाटपावरून याआधी दोन ते तीन वेळा प्रकाश आंबेडकरांना प्रस्ताव देण्यात आला आहे. पण प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रस्तावावर उत्तर आलेले नाही. त्यामुळे काय होईल मला माहिती नाही, कारण त्या संपूर्ण चर्चेत मी नाही आहे, असे संजय राऊत म्हणाले.
त्यांनी सांगितले की, मी प्रकाश आंबेडकरांना अनेक वर्षे ओळखतो, पण ते मध्यंतरी म्हणाले मी संजय राऊतांना ओळखत नाही. त्याच्यामुळे ज्या माणसाला ते ओळखत नाहीत त्यांनी त्या विषयावर बोलणे योग्य नाही. त्यामुळे मी शिवसेनेवर बोलेल, असे सांगत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल जास्त बोलणे टाळले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -