घरमुंबईमुंबईला अतिवृष्टीचा इशारा; सोमवारी सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर

मुंबईला अतिवृष्टीचा इशारा; सोमवारी सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर

Subscribe

दोन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवार आणि रविवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. पुढच्या ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा मिळाला असल्याने सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शाळा आणि काॅलेजना सुट्टी देण्यात यावी, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्यात येईल,  असाही निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाशी सर्व सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था, सर्व शैक्षणिक विभाग, विद्यापीठ कार्यालये आणि विद्यापीठ उपपरिसर यांना सुट्टी जाहिर करण्यात येत असल्याचे पत्रक कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी काढले आहे. या अनुषंगाने परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी आपल्या स्तरावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी महाविद्यालयांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -