घरदेश-विदेशसंपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय, मात्र मुसळधार पावसाला केव्हा होणार सुरुवात?

संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय, मात्र मुसळधार पावसाला केव्हा होणार सुरुवात?

Subscribe

मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भ, तेलंगणाचा बहुतांश भाग, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाचा काही भागाकडे वाटचाल करत आहे

मान्सून गुरुवारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मान्सून राज्यात सक्रिय झाला असला तरी जूनच्या पंधरा दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमीच राहिले.

मान्सून पूर्व पावसाने १० जूनला तळकोकणात हजेरी लावली. त्यानंतर पुढील ५ दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला. परंतु त्यानंतरही पावसाने म्हणावा तसा जोर धरला नाही. अनेक ठिकाणी अजूनही पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे मान्सून दाखल होऊनही अद्याप मुसळधार कोसळत नसल्याने चिंता व्यक्त होते. मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण घटल्याने मुसळधार पाऊस झाला नाही. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. यामुळे राज्यात दरवर्षी जूनच्या पहिल्या पंधरावड्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण 56 टक्क्यांनी घटले आहे. अशी परिस्थितीमुळे राज्यातील खरिपाच्या पेरण्या आणि पाण्यातील साठ्याबाबत चिंता व्यक्त होतेय.

- Advertisement -

दरम्यान येत्या रविवारपासून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचे जोरदार आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

तर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढणार असल्याने येत्या १९ जूनपासून मुख्यत: दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, पालघर, ठाणे, मुंबईत२६ जूनपर्यंत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांच्या घाट विभागातही पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाडय़ातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

देशातील मान्सूनची स्थिती

दिल्लीत शुक्रवारी पहाटेपासूम मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. यात हवामान विभागाने दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून वादळासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरापासून ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारतातील जोरदार वाऱ्यांच्या प्रभावाखाली 16 ते 18 जून दरम्यान आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 17 जून रोजी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 16 ते 19 जून दरम्यान तेलंगणा, 16 ते 18 जून दरम्यान तामिळनाडू आणि 18 ते 20 जून दरम्यान दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 20 जूनला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भ, तेलंगणाचा बहुतांश भाग, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाचा काही भागाकडे वाटचाल करत आहे.


राहुल गांधींना ईडीकडून दिलासा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवारी होणार चौकशी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -