घरताज्या घडामोडी२६ चा आकडा गाठायला जे कमी पडतील त्यांची विकेट पडेल - अजित...

२६ चा आकडा गाठायला जे कमी पडतील त्यांची विकेट पडेल – अजित पवार

Subscribe

जो उमेदवार २६ चा आकडा गाठायला कमी पडेल त्याची विकेट पडेल असं अजित पवार म्हणालेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. अपक्ष आमदारांची जमवाजमव करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच, या निवडणुकीत कोण विजयी होईल असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी फार मिश्किल उत्तर दिलं आहे. जो उमेदवार २६ चा आकडा गाठायला कमी पडेल त्याची विकेट पडेल असं अजित पवार म्हणालेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. (Ajit pawar on vidhan parishad election and agneepath scheme in press conference)

हेही वाचा – तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा, खासदार उदयनराजेंचं अजित पवारांना आव्हान

- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतांचा कोटा जास्त ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं पवारांनी सांगितलं. शिवसेनेचे उमेदवार अडचणीविणा निवडून येतील. पण आम्हाला मतांची गरज आहे, असंही अजित पवार म्हणाले.

अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे अपक्षांना काहींनी फोन केलेत हे खरंय. अपक्षांची गरज सगळ्यांनाच आहे. बहुजनविकास आघाडीच्या नेत्यांना सर्व उमेदवार जाऊन भेटत आहेत. ते अपक्ष असल्याने त्यांना आपल्या बाजुने फिरवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करणार, असंही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान दिल्लीला गेले, वाद संपला, भाषण नाकारल्याच्या प्रकरणावर अजित पवारांचे स्पष्टीकरण

२८८ उमेदवारांपैकी एकजण मृत आहे. दोघांना कोर्टाकडून परवानगी नाही. भाजपचे दोन आमदार गंभीर आजारी असल्याने ते मतदान करतील की नाही माहित नाही. त्यामुळे २८४ सदस्यांकडून मतदान होईल. त्यात तर २६ चा कोटा निर्माण होईल. २६ चा आकडा जो गाठायला कमी पडेल त्याची विकेट पडेल असंही अजित पवार म्हणाले.

आज संध्याकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. मला अजून कोणत्याही सूचना आल्या नाही. कुणीही दबाव आणल्याचे अजून सांगितलं नाही. यावेळी आमदार निवडून देत असताना आपल्याकडे व्यवस्थित कोटा आहे. मागच्या वेळी आमचे उमेदवार निवडून देऊन कमी मतं उरत होती. त्यामुळे आम्ही एकत्र बैठक घेतली होती. मात्र आता शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येतील असं चित्र आहे. आम्हाला थोडी संख्या कमी पडतेय त्याबाबत आम्ही अपक्षांची मदत घेऊ, असेही अजित पवार म्हणाले.


तरुणांना केलं आवाहन

यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेवरून चाललेल्या  हिंसाचारावरही भाष्य केलं. त्यांनी तरुणांना विनंती करून देशाच्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान न करण्याचं आवाहन केलं आहे. तरुणांच्या भावना आम्ही समजू शकतो. सध्या नोकरीचा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. त्याकाळा अशा योजना आल्याने तरुणांची माथी भडकणं स्वाभाविक आहे. पण तुम्हा कोणाचंच नुकसान होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ पण संपत्तीचं नुकसान करणं हिताचं नाही. यामुळे देशाचं नुकसान होतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -