घरमुंबईपालघरमध्ये ३.५ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के; जीवितहानी नाही

पालघरमध्ये ३.५ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के; जीवितहानी नाही

Subscribe

पालघर जिल्ह्यातील काही भागात आज भूकंपाचे धक्के बसले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसल्याचे समोर आले आहे.

पालघर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरुन केले असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली आहे. सुदैवाने यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झालेली नाही. गेल्या वर्षांपासून या परिसरात भूकंपाचे हादरे बसत आहेत.

जीवितहानी नाही

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत आज सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. याबाबत ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी माहिती दिली आहे. या भूकंपाच्या तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली असून सुदैवाने कोणतेही नुकसान झाल्याची अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. नोव्हेंबर २०१८ पासून वारंवार धुंदलवाडीला भूकंपाचे हादरे बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी या गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.९ इतकी होती.

- Advertisement -

हेही वाचा – आता कैद्यांनाही मारता येणार मांसाहार खाद्यपदार्थांवर ताव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -