घरमुंबईठाकरे सरकारमध्ये ठाण्याला मंत्रिपद

ठाकरे सरकारमध्ये ठाण्याला मंत्रिपद

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 29 वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी शिवतीर्थावर शपथ घेतली. ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात ठाण्यालाही मंत्रीपद मिळाले आहे. शिवसेनेचे नेते, विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण आहे. शिवसैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला.

राज्यात नाटयमय घडामोडीनंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाले आहे. गुरूवारी शिवतीर्थावर ऐतिहासीक असा शपथविधी सेाहळा पार पडला. ठाकरे सरकारमध्ये सहा मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यात ठाण्याला मंत्रीपद मिळाले. एकनाथ शिंदे यांनी पून्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. युती सरकारमध्येही शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते. आता ठाकरे सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्री बनले आहेत. राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना आमदारांच्या फोडीफोडी सुरू होती. त्यावेळी फुटलेल्या आमदारांना परत आणणे सुरक्षित स्थळी ठेवणे आदी जबाबदारी शिंदे यांनी पार पडली होती.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात एकूण 18 आमदार असून, शिवसेनेचे 5 आमदार आहेत. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांची ठाणे जिल्ह्यावर पकड होती. दिघे यांच्या निधनानंतर त्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर पडली. दिघेंच्या तालमीत शिकलेले शिंदे यांनी हे शिवधनुष्य सहज पेलवले. ठाणे, पालघर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आलेल्या महापुराच्या संकटातही शिंदे धावून गेले होते. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे एकनाथ शिंदे किसननगरचे शाखाप्रमुख बनले. रिक्षाचालक, शाखाप्रमुख- नगरसेवक- आमदार -विरोधी पक्षनेता- कॅबिनेट मंत्री ते शिवसेनेचे नेते अशी शिंदे यांची राजकीय वाटचाल थक्क करणारी आहे. अतिशय शांत सयंमी स्वभाव म्हणून शिंदे यांनी ओळख आहे. त्यामुळे सर्वच पक्षात त्यांचे मैत्रीचे संबध आहेत. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली सत्ता ही ठाण्यात मिळाली. त्यानंत सेनेच्या सत्तेची दारे खुली झाली. ठाणे आणि शिवसेना असे एक वेगळे नाते ओळखले जाते. त्यामुळे शिंदे यांच्या रूपाने एकदा ठाणे जिल्ह्याच्या पदरात कॅबिनेट मंत्रीपद पडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -