घरमुंबईशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची निवडणूक ड्युटी शिक्षणाधिकार्‍यांच्या मान्यतेनेच

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची निवडणूक ड्युटी शिक्षणाधिकार्‍यांच्या मान्यतेनेच

Subscribe

शिक्षणाधिकार्‍यांनी बजावले आदेश

निवडणूक कामांकरता महापालिका कर्मचार्‍यांना थेट निवडणूक आयोगाच्यावतीने आदेश काढण्यात आले आहेत. यासर्व कर्मचार्‍यांना त्वरीत कार्यमुक्त करण्याची सूचना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्यानंतर शिक्षणाधिकार्‍यांनीही आपल्या अधिकार्‍यांना सूचना देवून निवडणूक कामांसाठी गेलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांना परत त्वरीत बोलावून घेण्याचे आदेश बजावले आहे.तसेच आपल्या मान्यतेशिवाय कुठल्याही शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना निवडणूक कामांसाठी कार्यमुक्त करण्यात येवू नये,असेही बजावले आहे.

महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने मंगळवारी १२ मार्च रोजी परिपत्रक जाहीर करून हे आदेश दिले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ व पर्यवेक्षक अर्थात सुपरवायझर म्हणून निवडणूक कर्तव्यार्थ पाठवलेल्या महापालिका कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करण्याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांच्या स्वाक्षरीने मुंबई शहर व मुंबई उपनगरे यांच्या जिर्‍हाधिकार्‍यांना अर्धशासकीय पत्र पाठवले आहे. त्याअनुषंगाने आपल्या अखत्यारितीत कार्यरत असणार्‍या अधिकारी तथा कर्मचारी यांना आपल्या कार्यालयामार्फत निवडणूक कामासाठी पाठवलेले असल्यास त्यांना निवडणूक कर्तव्यातून त्वरीत बोलावून घ्यावे,असे निर्देश शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी उपशिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, यांना दिले आहेत.

- Advertisement -

याशिवाय शिक्षण खात्याच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले सर्व अधिकारी,शिक्षक आणि शिक्षकत्तेर कर्मचारी यांना निवडणूक कामकाजाकरता खाते प्रमुखांच्या मान्यतेशिवाय परस्पर कार्यमुक्त करण्यात येवू नये,असेही त्यांनी आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -