घरमुंबईइमॅजिका पार्कची रात्रीस पाणी चोरी!

इमॅजिका पार्कची रात्रीस पाणी चोरी!

Subscribe

ग्रामस्थांनी ठोकले टाळे

कलोते ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील योजनांना पाणी मिळत नसल्याने इमॅजिका वॉटर पार्कचा पाणी पुरवठा तहसीलदार खालापूर यांच्या आदेशाने बंद केला होता. मात्र इमॅजिका रात्रीचे पाणी चोरते हे मीटर रिडिंगवरून निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी पम्प हाऊसला टाळे ठोकले.

ग्रुप ग्रामपंचायत कलोते यांच्या अंतर्गत कलोते मोकाशी, कलोते रयत, विणेगावं, कातलाची वाडी, कांढरोली व दांडवाडी या पाणी योजना असून सर्व योजना कलोते धरणाच्या पाझर पाण्यावर अवलंबून आहेत. धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर पाझरही बंद झाले. तीव्र पाणी टंचाईमुळे रयती या गावाला ग्रामपंचायतीमार्फत टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. याबाबतीत ग्रुप ग्रामपंचायत कलोते यांनी तहसीलदार खालापूर, इमॅजिका व पाठबंधारे यांना लेखी कळविले होते. इम्याजिकाचा पाणी पुरवठा बंद करण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी याची दखल न घेतल्यास ग्रामस्थ पाईपलाईन तोडतील, असा इशाराही दिला होता. याची दखल घेऊन तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी इम्याजिकाचे व्यवस्थापक व पाठबंधारे यांची बैठक घेऊन पाणी पुरवठा बंद करण्यात आला.

- Advertisement -

असे असताना रात्रीच्या अंधारात इमॅजिका पाणी चोरत असल्याचे संदीप जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी ज्यादिवशी पाणी बंद केले तो दिवस व त्यांनतरचे मीटर रिडिंग पडताळले,तेव्हा पाणी चोरून घेतले हे सिद्ध झाले. ग्रामस्थांनी तहसीलदारांना भेटण्याचा दिवसभर प्रयत्न केला, पण भेट न झाल्याने संदीप जाधव, सुनील गायकवाड, गुरुनाथ पालांडे, ज्ञानेश्वर साळुंखे, दिनेश महाडिक, बळीराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंप हाऊसचेे कुलूप काढून स्वत:चे कुलूप ठोकले. तरीदेखील इम्याजिकाने पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास धरणातील पाणी खेचण्याचे दोन पंप काढून टाकण्यात येतील, असा इशाराही संदीप जाधव यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -