घरमुंबईआयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी

Subscribe

कौशल्य प्रशिक्षण माहितीसाठी राज्यभरात अ‍ॅप्रेंटिशीपचे मेळावे

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार निवडीसाठी राज्यभरात आठ ठिकाणी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कराड, औध पुणे, पिंपर चिंचवड आणि सातारा आदी ठिकाणी हे मेळावे होणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

शिकाऊ उमेदवारी भरती होणेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून उत्तीर्ण व फ्रेशर विद्यार्थ्याकरिता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या योजनेद्वारे अप्रशिक्षित, तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारास प्राधान्य काम देऊन त्यांना एका वर्षाचे प्रशिक्षण देते. याकाळात त्यांना आर्थिक सहाय्य केल्या जाते. गरज भासल्यास त्यांना नियमित स्वरूपात (पगार देऊन) नोकरीत सामावून घेतल्या जाऊ शकते. शिकाऊ उमेदवारांवर शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 नुसार नियंत्रण ठेवले जाते. राज्यभरात होणार्या या मेळाव्यासाठी विविध कंपन्या सहभागी होणार आहेत. अधिकाधिक व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण, फ्रेशर उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संचालनालयाने केले आहे.

- Advertisement -

येथे होणार भरती मेळावा सकाळी 10 पासून

कोल्हापूर : 2 डिसेंबर,
सोलापूर : 3 डिसेंबर,
सांगली : 4 डिसेंबर
कराड : 5 डिसेंबर
औंध पुणे : 6 डिसेंंबर
औध पुणे (राज्यस्तर मेळावा) 12 डिसेंबर
पिंपरी चिंचवड : 7 डिसेंबर
पिंपर चिंचवड : 11 डिसेंबर
शा.ता.वि. पुणे : 9 डिसेंबर
सातारा : 10 डिसेंबर

अ‍ॅप्रेंटिशीपसाठी झालेली नोंदणी

विभाग – नोंदणी – भरतीसाठी
पुणे -1845 – 9198
नाशिक – 2631 – 13533
नागपूर – 440 – 2908
औरंगाबाद – 1315 – 4118
अमरावती -601 – 1379
एकूण -8003 – 36341

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -