घरमुंबईमाजी बँक अधिकाऱ्याने केला मोलकरणीचा विनयभंग; आरोपीला अटक

माजी बँक अधिकाऱ्याने केला मोलकरणीचा विनयभंग; आरोपीला अटक

Subscribe

न्यायालयासमोर हजर करताच आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

एका माजी बँक अधिकाऱ्याने त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीशी शारीरिक लगट करून तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडिताने घरातून पळ काढला आणि याबाबतची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी आरोपीला काल रात्री अटक केली आहे. दरम्यान न्यायालयासमोर हजर करताच आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अशी घडली घटना

उल्हासनगर – ४ येथील सुभाष टेकडी परिसरात काल सकाळी १० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या परिसरात भीमराव दाणी (६८) वर्षीय व्यक्ती त्याच्या कुटुंबासह राहतो. त्याचे कुटुंबिय काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांची २३ वर्षीय मोलकरीण काम करण्यास आली होती. दाणी याने मोलकरणीस जेवण बनविण्यास सांगितले. यावेळी एकांताचा फायदा घेऊन त्याने शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मोलकरणीने तेथून पळ काढला आणि घर गाठले. यानंतर तिने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी दाणी याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

- Advertisement -

घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले

पोलिसांनी दाणी याच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात आरोपीचे कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा – हाफकिनकडून औषध मागणीचे टेंडर विलंबाने?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -