घरताज्या घडामोडीबदलापूरमध्ये MIDC कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू, २ जण जखमी

बदलापूरमध्ये MIDC कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू, २ जण जखमी

Subscribe

एमआयडीसीतील के. जे. रेमेडिज नावाच्या कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली असून या घडनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत.

बदलापूर परिसरात असणाऱ्या एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, या स्फोटामध्ये एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन कामगार जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील के. जे. रेमेडिज नावाच्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. सकाळच्या सुमारास कंपनीतील ड्रायरचा स्फोट झाला असून स्फोटामुळे काही भागात आग लागल्याची घटना घडली असून या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तसेच या स्फोटात जखमी झालेल्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -