घरमुंबईफॉर्म 17 भरणार्‍यासाठी मुदतवाढ

फॉर्म 17 भरणार्‍यासाठी मुदतवाढ

Subscribe

विलंब शुल्क भरून करता येणार अर्ज

प्रतिनिधी:-फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा फॉर्म क्रमांक 17 भरून देण्यार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दिलासा देण्यात आला आहे. फॉर्म क्रमांक 17 ऑनलाईन भरण्यासाठीची मुदत अतिविलंब शुल्कासह 14 नोव्हेेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

खासगीरित्या दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना 17 क्रमांकाचा अर्ज भरावा लागतो. हा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी 19 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. दहावीच्या विद्यार्थ्यांना हे अर्ज http://form17.mh-ssc.ac.in आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर भरायचे होते. परंतु अनेक विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता आले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरता यावा यासाठी शिक्षण विभागाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्क 100 रुपये आकारून ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी अर्ज करता येणार आहे. तर, बारावीच्या विद्याथ्यार्र्ंना 25 रुपये विलंब शुल्क आकारले आहे. मात्र, त्यानंतरही अर्ज भरण्यास विलंब झाल्यास 20 रुपये अतिविलंब शुल्क आकारून विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी करता येणार आहे.

- Advertisement -

विलंब शुल्कासह जमा झालेले नावनोंदणी अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रांसह त्यावर ‘लेट फॉर्म’ असा शेरा लिहून 14 नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे पोहोचवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे संपर्क केंद्रांना देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -