घरमुंबईआयडॉलच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; २९ डिसेंबरपर्यंत भरता येणार अर्ज

आयडॉलच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; २९ डिसेंबरपर्यंत भरता येणार अर्ज

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला वर्ष २०२०-२१ या जुलै सत्रासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ ऑक्टोबरला मान्यता दिली. आयडॉलमध्ये जुलै सत्रात आजपर्यंत ५६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) जुलै २०२० या सत्रातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढ दिली आहे. या अंतिम फेरीत विद्यार्थ्यांना २९ डिसेंबरपर्यंत प्रवेशाचे अर्ज भरता येतील.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला वर्ष २०२०-२१ या जुलै सत्रासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ ऑक्टोबरला मान्यता दिली. आयडॉलमध्ये जुलै सत्रात आजपर्यंत ५६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षी प्रथमच आयडॉलने प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी हे पदवीस्तरावरील अभ्यासक्रम व एमए आणि एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी व एमसीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सत्र पद्धतीमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टीममध्ये सुरू केले आहेत.

- Advertisement -

ही मुदतवाढ बीए, बी.कॉम, बीएस्सी आयटी, एमए (मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र,राज्यशास्त्र), एमए (शिक्षणशास्त्र), एम.कॉम, एमए आणि एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी भाग २ कॉम्प्युटर सायन्स व व्यवस्थापनाचे दोन अभ्यासक्रम पीजी डीएफएम व पीजी डिओआरएम या अभ्यासक्रमासाठी झाली आहे. जुलै सत्रासाठी ही अंतिम मुदतवाढ असून विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -