घरमुंबईप्रसिद्ध चित्रकार राम कामत यांची आत्महत्या; बाथटबमध्ये आढळला मृतदेह

प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांची आत्महत्या; बाथटबमध्ये आढळला मृतदेह

Subscribe

प्रसिद्ध चित्रकार राम इंद्रनील कामत यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह मुंबई येथील राहत्या घरी बाथटबमध्ये आढळला. ते मुंबईतील माटुंगा येथे राहत होता. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ४१ वर्षीय राम कामत आपल्या आई आणि बहिणीसोबत मुंबईतील माटुंगा येथे राहत होते.

राम कामत बुधवारी संध्याकाळी आंघोळ करण्यासाठी गेले असता बराच वेळ झाला तरी ते बाथरूममधून बाहेर आले नाही., त्यामुळे त्यांच्या आईने दरवाजा ठोठावला. मात्र दरवाजा आतून बंद केला नसल्यामुळे दार उघडून त्यांची आई जेव्हा आत गेली, तेव्हा राम कामत बेशुद्धा अवस्थेत बाथ टबमध्ये पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना सुसाइड नोटही मिळाली आहे. आपल्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. राम इंद्रनील कामत यांच्या कुटुंबाची आणि जवळच्या नातेवाईकांची पोलीस चौकशी करत आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राम कामत यांना नैराश्याने ग्रासले होते आणि त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र ते नैराश्यामध्ये का होते याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांनी एडीआर दाखल करून याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, राम कामत यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणे अजून बाकी आहे, शिवाय व्हिसेरा टेस्टिंगसाठी पाठवण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. राम यांचा मृत्यू बाथरूम टबमध्ये बुडून झाला की, त्यांनी कुठचा विषारी द्रव्यपदार्थ घेतला होता? मात्र पोलीस सुसाईड नोट मिळाल्यामुळे आत्महत्या समजून तपास करत आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -